नवी दिल्ली – जागतिक बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे विविध कंपन्या या बाजार पेठेत टिकून राहण्यासाठी नवनवीन मॉडेल लाँच करत आहेत. नुकतेच चीनची नामांकित कंपनी अलिबाबाने एक इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या बाइकला फक्त एकच चाक आहे. त्याचबरोबर ही बाइक एकदा चार्ज केली की 100 किमी अंतर कापते. बाइकच्या बॅटरीचा चार्ज होण्याचा कालावधी 3 ते 12 तासांपर्यंत आहे.
डिज़ाइन
इंटरनेटवर या बाइकचा फोटो पाहून लक्षात येते की, यामध्ये स्टीलचे trellis frame दिले आहेत. या व्यतिरिक्त एक फ्यूल टँक सुद्धा देण्यात आला आहे. जे की Ducati Monster च्या प्रेरणेतून तयार करण्यात आले आहे. यात मागील सीटसुद्धा असली तरी ती किती प्रभावी आहे हे सांगता येत नाही.
पावर आणि परफॉरमेंस
या बाइकमध्ये कंपनीने जी मोटर दिली आहे. ती 2000 वॅटची पावर जेनरेट करते. ही बाइक इतर बाइकच्या तुलनेत खूपच हलकी आहे. तिचे वजन 40 किलो आहे. या बाइकचे टॉप स्पीड 48kmph आहे. तसेच 60 ते 100 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.
किंमत
या बाइकची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास 1.34 लाखापर्यंत निश्चित केली आहे. अलिबाबा या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन विभागात मोठ्या प्रमाणातील मागणी पाहता अलिबाबाने ही बाइक लाँच केली आहे. नुकतेच या कंपनीने चीनची सरकारी ऑटो कंपनी SAIC सोबत भागीदारीत इलेक्ट्रिक कार बनवण्याची घोषणा केली आहे. ज्याचे सर्वात मोठे फीचर हे या कारचे वायरलेस चार्जिंग सिस्टीम असणार आहे.