Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ऍन्टीव्हायरल कडुनिंब – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 29, 2021
in आरोग्य वार्ता
A A
ऍन्टीव्हायरल कडुनिंब – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

प्राचीन काळापासुन कडुनिंब किंवा नीम हे अतिशय आश्‍वासक अशी वनस्पती म्हणून ओळखली जाते. मानवाला अत्यंत उपयोगी तसेच सर्व प्राणीमात्रांमध्ये विविध कारणांसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती आहे. कडुनिंब याला “अरिष्ट’ असे संबोधले जाते. “अरिष्ट’ म्हणजेच सर्व रोगांचा नाश करून स्वत: नष्ट न होणारा.

मराठी महिन्यांची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला होते. त्या दिवशी कडुनिंबाची डहाळी वापरतात. तसेच कडुनिंबाची पाने चावून खाण्याची प्रथा आहे. कडुनिंब हा शीतगुणयुक्‍त असतो. त्यामुळे उन्हाची दाहकता कमी होते. पित्तामुळे होणाऱ्या आजारापासून संरक्षण करतो. कडुनिंबाची कडू चव व तुरटपणा हा कफ विकारांचा नाश करणारा आहे. तसेच अतिश्‍लेष्मा याला शोषून घेणारा आहे.

कडुनिंब हा बहुउपयोगी वृक्ष आहे. त्याला “गावाकडचा वैद्य’ असे म्हटले जाते. कडुनिंबाची फांदी ही दातासाठी ब्रश म्हणून वापरण्यात येते. कडुनिंबाची एखादी डहाळी तोडुन ती दाताखाली चावुन त्याचा ब्रश किंवा दातुन तयार केला जातो. हे करत असताना कडुनिंबाचा रस व त्यातील अनेक घटक हे मुखशुद्धीकरता उपयोगी पडतात.

तोंडाची स्वच्छता तसेच हिरडयांचे दुखणे, सुजणे, तोंडाचा वास नष्ट करणे यासाठी कडुनिंब खुप चांगला असतो. कडु चवीमुळे तोंडातील लाळेचे स्त्रवण चांगले होते. तसेच मुखशुध्दी व संपूर्ण पचनसंस्थेची शुध्दी होते. पाचक अग्नि चांगला होतो व आम पचन उत्तमप्रकारे होते.
कडुनिंब जंतुनाशक समजला जातो.

किटक व जंतु यांचा नायनाट करून हवा शुध्द करण्याचे काम करतो. म्हणुनच कडुनिंबाची झाडे असणाऱ्या परिसरातील हवा शुध्द व स्वच्छ असते.उन्हाळयात उद्‌भवणारे गोवर, कांजिण्या हया सारख्या रोगांना कडुनिंब अतिशय गुणकारी ठरतो. ताप कमी होण्यासाठी कडुनिंबाचा रस पोटातून दिला जातो. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावली जाते.

अंगावर उठणारे डाग नष्ट करण्यात व त्वचेची रूक्षता कमी करण्यास कडुनिंब उपयोगी पडतो. कडुनिंब ऍन्टीव्हायरल म्हणजेच विषाणुप्रतिबंध करणारा म्हणून अनेक आजारात वापरला जातो. डेंग्युमध्ये ज्वर कमी करतो तसेच डेंग्युच्या व्हायरसविरोधी काम करतो. त्वचेवर रॅशेस किंवा नागीण या आजारामध्येदेखील कडुनिंब चांगल्याप्रकारे काम करू शकतो. शरीरातील दाह कमी करणे व शीतलता प्रदान करण्याचे काम कडुनिंब करतो. ऍन्टीव्हायरल कार्यामुळे इन्फेक्‍शन कमी करणे व व्रण कमी करणे यांत कडुनिंब उपयोगी आहे.

कडुनिंब त्वचेच्या रोगांमध्ये वापरला जातो. कुष्ठघ्न म्हणुन तो काम करतो. त्वचेची खाज, पुरळ, मुरमे यांवर चांगल्या प्रकारे उपयोग होतो. व्रण झाल्यास त्यातील पू नष्ट करणे, व्रण स्वच्छ करणे व व्रण रोपण करण्याचे काम करतो. त्वचेवरील पुरळ, फोड शीतपित्त यामध्ये कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून ते पाणी उकळविले जाते व त्याच कोमट पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा विकार नष्ट होतात.

श्‍वसन संस्थेत कडुनिंबाचे खूप चांगले कार्य दिसून येते. श्‍वास नलिकेत कफ साठल्याने होणारी घरघर किंवा छाती भरणे यामध्ये कडुनिंबाचा काढा, गुळवेल व पिंपळी याबरोबर दिल्यास छाती मोकळी होते व कफ बाहेर पडतो. कफ अतिप्रमाणात असेल तर कडुनिंबाचे चुर्ण, हळद, ज्येष्ठमध हे सर्व मधाबरोबर दिल्यास चांगला फरक पडतो. कडुनिंबाच्या सालीचा अर्क किंवा काढा जीर्ण खोकला व श्‍वसन विकारात वापरतात. क्षयाच्या रोग्याला कडुनिंबाचा काढा कफ कमी करण्यासाठी दिला जातो. सर्व प्रकारचे ज्वर तसेच जीर्ण ज्वरात कडुनिंब “ज्वरघ्न’ म्हणून काम करतो. विषाणु संसर्ग झाल्यास विषाणुच्या शरीरातल्या कार्यप्रणालीला अटकाव बसवतो व संसर्ग जास्त पसरू देत नाही.

कडुनिंबाची साल मलेरियामध्ये वापरली जाते. ताप कमी करणे हा गुणधर्म कडु रसामुळे प्राधान्याने कडुनिंबात दिसून येतो. पोटाच्या विकारांमध्ये कडुनिंबाचा उपयोग केला जातो. पोटाचा व आताडयांचा अल्सर्स मध्ये, याचा वापर शीत गुणांमुळे थंडावा देण्यासाठी तसेच पोट दुखणे कमी करण्यासाठी केला जातो. पोटाचे अनेक विकार पचन नीट न झाल्यामुळे दिसून येतात. कडुनिंब पाचक रस स्त्रवण्यासाठी उपयोगी पडतो व पोटातील अपचित अन्न नीट पचवण्यास मदत करतो.

कडुनिंबाची फुले यकृतातील स्त्रावावर चांगल्या प्रकारे काम करतात. इपसम कमी करण्यास मदत करतात यकृत विकरांमध्ये देखील कडुनिंब कुटकी व माका वारल्यास खुप चांगला उपयोग होतो. लहान मुलांमध्ये जंत झाल्यास कडुनिंबाच्या फुलांचा वापर केला जातो. कडुनिंबामध्ये असणारे ऍझाडिरेक्‍टीन घटक जंतांचा नाश करतो व शरीराबाहेर टाकण्यास मदत करतो.

केसांमधील कोंडा यावर नीम उत्तम काम करतो. ऍन्टीफंगल असल्याकारणाने नीम पावडर कोंडा कमी करते. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट किंवा पावडर लिंबाच्या रसात मिसळुन अर्धा तास डोक्‍याला लावुन डोके कोमट पाण्यानी धुवावे. कडुनिंबाने केसातील कोंडा, लीखा कमी होतात व केस गळणे कमी होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar