Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ऋतुमानाप्रमाणे भाज्यांची निवड

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2021
in लाईफस्टाईल
A A
ऋतुमानाप्रमाणे भाज्यांची निवड
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भाजी हा रोजच्या आहारातील एक अत्यावश्‍यक पदार्थ. भाजीविना आपले भोजन अपुरे असते. भाज्या दोन प्रकारे काम करतात. एक तर आवश्‍यक ते अन्नघटक देतात आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे भोजनाला एक टेस्ट देतात. चटकदारपंणा आणतात. भाजीशिवाय भोजन की कल्पनाच मनाला पचत नाही. कसली का असेना, पण भाजी हवी.

भाजीची निवड करताना घरातील सदस्यांच्या आवडीनिओवडीचा विचार करत असताना ऋतुचा विचार करणेही आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच आवश्‍यक असते. खास करून पावसाळ्यात तर अधिकच.

त्याबाबत काही टिपा

  • भेंडी, ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल. या भाज्यांत कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्‍सिडंट असल्याने त्या फायदेशीर आहेत; परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी त्या न खाणेच उत्तम.
  • लाल, दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या उन्हाळा आणि पावसाळ्यातही खाव्यात. स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांनी, धमनीविकार असलेल्यांनी, वयस्कर लोकांनी या भाज्या खाणे जास्त उपयुक्त असते.
  • मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या हिवाळा आणि उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते.
  • मलविरोध, अँसिडिटी, स्थूल, गर्भवती व बैठी जीवनपद्धती असणाऱ्यांनी या पालेभाज्या आवर्जून खाव्यात. किडनी विकार असणाऱ्यांआनी मात्र या भाज्या टाळाव्यात.

भाज्या

  • कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे, बीट यांसारख्या कंदभाज्या उन्हाळ्यात खाणे हितकारक असते. मधुमेहींनी बटाटा, रताळे, बीट मात्र वर्ज्य करावेत.
  • हिवाळ्यात काय खावे, खाऊ नये.
  • शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल-पावटे अशा शेंगभाज्या खाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतू आहे.
  • गॅसेस, मलावरोधाचा त्रास असणार्यांरनी मात्र या अजिबात खाऊ नये. हायकोलेस्टेरॉल, उच्चरक्तदाब, मधुमेहींना या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल
  • वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्‍य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
  • मधुमेही व्यक्‍तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.
  • भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar