सध्या लोकांकडे खाण्यापिण्याचे इतके वैविध्यपूर्ण आणि ढीगभर पर्याय आहेत की या वेगवेगळ्या पदार्थांमुळे कोणती गोष्ट हानी पोहोचवू शकते हेच कळत नाही. कधी-कधी स्ट्रीट फूड खाताना आपली नजर अनेक अस्वच्छ गोष्टींकडे दुर्लक्ष करते, पण पोटाला ते करणे कठीण जाते. त्यामुळे पोट खराब होणे, गॅस बनणे, आम्लपित्त किंवा उलट्या होणे असे वाटणेही सामान्य झाले आहे. जेव्हा जेव्हा काही अयोग्य आणि संक्रमित अन्न शरीरात प्रवेश करते तेव्हा शरीर त्या गोष्टी उलटीच्या रूपात बाहेर टाकते.
अति खाल्ल्याने आणि अन्न न पचल्यामुळे उलट्या होणे किंवा मळमळ वाटणे देखील होते. आज असे काही घरगुती आणि सोपे उपाय जाणून घेऊया जे तुम्हाला उलट्यांपासून मुक्त होण्यास आणि त्वरित आराम मिळवण्यास मदत करतील.
लवंग
काही लवंगा तोंडात टाकून चोखून घ्या. लवंगाची चव आणि सुगंध उलट्या थांबवण्यास मदत करते. उलट्या थांबवण्यासाठी लवंग चघळणे किंवा गरम पाण्यात टाकून ते पाणी पिणे ही यावर उपयुक्त ठरेल.
आले
आले पाण्यात ठेचून त्यात एक चमचा मध टाकून प्या. दिवसातून अनेक वेळा प्यायल्याने उलट्या तर थांबतीलच पण पोटालादेखील आराम मिळेल.
लिंबूपाणी
लिंबूमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे उलट्या लगेच थांबवतात. ताजे लिंबूपाणी देखील थंडावा देईल.
बडीशेप
बडीशेप चघळल्याने उलट्या थांबतात. पाण्यात बडीशेप घालून ते चहाप्रमाणे प्यायल्यानेही खूप फायदा होतो. 10 मिनिटे पाण्यात उकळल्यानंतर ते गाळून प्या.
मीठ आणि साखर पाणी
पाण्यात मीठ आणि साखर मिसळून प्यायल्याने शरीरातील विस्कळीत पोषक तत्वे परत संतुलनात येतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि ताकदही टिकून राहते.