Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

उन्हाळ्यामध्ये एक ग्लास मोसंबी ज्युस ठरतोय आरोग्यदायी; जाणून घ्या ‘हे’ चमत्कारिक फायदे.!

by
May 16, 2023
in आहार
A A
उन्हाळ्यामध्ये एक ग्लास मोसंबी ज्युस ठरतोय आरोग्यदायी; जाणून घ्या ‘हे’ चमत्कारिक फायदे.!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – उन्हाळ्यात अनेकांना मोसंबीचा ज्यूस पिणे आवडते. हा ज्युस प्यायला चविष्ट तर असतोच पण तो आरोग्यासाठी अनेक फायदेही देतो. मोसंबी ज्यूसच्या कूलिंग इफेक्टमुळे शरीराला थंडावा देण्यासोबतच शरीराला दिवसभर हायड्रेट आणि फ्रेश राहण्यासही मदत होते.

या फळामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, जस्त, कॅल्शियम, फायबर, तांबे आणि लोह हे मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात मोसंबीच्या ज्यूसचे आरोग्यासाठी आणखी होणारे फायदे

वजन कमी होणे…
जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून तुमचे वजन कमी करायचे असेल, तर मोसंबीचा ज्यूस तुम्हाला मदत करू शकतो. सकाळी पाणी आणि मध मिसळून मोसंबीचा ज्यूस चे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होते मदत…
मोसंबीमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन ‘सी’ मुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि शरीर आतून मजबूत होते.तुम्हाला जर तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गोड मोसंबीचा ज्यूस पिऊ शकता.

त्वचेसाठी फायदेशीर…
मोसंबीमध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. या रसाचे सेवन केल्याने त्वचेवरील डाग आणि पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते.

मज्जासंस्थेसाठी ठरतेय उपयुक्त…
मानसिक समस्यांवरही मोसंबी ज्युस फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला नेहमी डोकेदुखी, चक्कर येणे आणि मळमळ होण्याची समस्या होत असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मोसंबी ज्युसचे सेवन करावे.

पचनक्रिया सुधारते…
मोसंबीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स पचन सुधारून अपचन आणि गॅस्ट्रिक समस्यांसारख्या पाचन समस्या दूर ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, शरीरातून बद्धकोष्ठता निर्माण करणारे हानिकारक विष काढून टाकण्यास देखील मदत करते.

The post उन्हाळ्यामध्ये एक ग्लास मोसंबी ज्युस ठरतोय आरोग्यदायी; जाणून घ्या ‘हे’ चमत्कारिक फायदे.! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar