पुणे – आपल्या आरोग्यासाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी असतो. मुळातच ऊस अत्यंत पौष्टिक असतो. चवीला अगदी गोड पण लो कॅलरी काँटेन्ट असलेल्या उसापासून आपल्या शरीराला अनेक मार्गांनी फायदा होऊ शकतो. असं म्हणतात कि, ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं.
सोबतच, आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतं. त्यात उसाच्या रसाला जेव्हा लिंबू आणि मिठाची जोड मिळते तेव्हा तो आणखी चवदार लागतो आणि आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देतो. उसामध्ये असलेली फायबरची उच्च पातळी कावीळ, अशक्तपणा आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते.
ऊस आपलं शरीर थंड करण्यासह जठराला आराम देण्याचं देखील काम जातो. आज आपण याचबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. उसाच्या रसाच्या सेवनाचे आणखी कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात? पाहूया…
उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे –
1) उसाचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये असणारी साखर शरीरातील साखरेची पातळी संतुलित करते. तसेच पचनक्रिया सुधारते.
2) उसाच्या रसातील जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, एन्झाइम्स आणि विविध पोषक घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात उसाचा रस शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवतो आणि अशक्तपणा दूर करतो.
3) उसाचा रस वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. त्यात साखर कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
4) उसाचा रस त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि बी-6 त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.उसाचा रस अँटी-एजिंग गुणधर्मांनी समृद्ध आहे जो आपल्याला वृद्धत्वाविरूद्ध लढण्यास मदत करतो.
5) उसाचा रस तुमची तंदुरुस्ती वाढवण्यास मदत करतो. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
The post उन्हाळ्यामध्ये उसाचा रस ठरतोय आरोग्यदायी; जाणून घ्या ‘हे’ चमत्कारिक फायदे ! appeared first on Dainik Prabhat.