सब्जा सगळ्यांना माहिती असेल. सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर रंगाचे असते. सब्जा बी हे चवीला गोड असून शरीराला थंडावा वाढवून उष्णता कमी करते. काही जणांना वारंवार युरिन इन्फेकशन होते, अशा लोकांनी सब्जाचे बी सकाळ-संध्याकाळ घेतल्यास चांगला आराम पडतो.
पोषक तत्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठी नाही, तर मेंदूसाठी खूप फायदेशीर असतो.
सब्जामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्याचसोबत यात फायबर असतात.
सब्जामध्ये 4 ग्राम प्रोटिन, 5 ग्राम ओमेगा 3, 18% कॅलसिम, मॅग्नेशियम असतं.
यात झिंक, व्हिटॅमिन बी-3, व्हिटॅमिन बी-2 चांगलं प्रमाण असतं.
सब्जाच बी हे अँटीऑक्सिडंटचं पॉवर हाऊस आहे. यात सर्व प्रकारचे कर्ब, फायबर असतात.
हायफायबर आणि प्रोटीन प्रमाण अधिक असल्याने हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं.
मधूमेही लोकांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत करते.
पोट स्वच्छ झाल्याने अपचन आणि गॅसचा त्रास कमी होतो.
सब्जा बियांचा त्वचा आणि केसांवर देखील चांगला परिणाम होतो.
सब्जा बी कसे सेवन करावे
एका वाटीमध्ये 2 चमचे सब्जा बी घ्या आणि त्यामध्ये या बिया भिजतील एवढं पाणी घाला. 15 ते 20 मिनिटांनी बियांचा आकार फुगून दुप्पट होईल. तुम्ही या बिया पाणी, लिंबू पाणी, मिल्कशेक, फालुदा, दही, ताक अथवा सॅलड सोबत खाऊ शकता. उन्हाळ्यात घराबाहेर जाताना नेहमी पाण्याच्या बाटली मध्ये सब्जाचे पाणी अथवा सरबत सोबत ठेवा. ज्यामुळे तुम्हाला उष्मघाताचा त्रास होणार नाही.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.