पुणे – आता हळूहळू गोडगुलाबी थंडी जाऊन उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होते, त्याचबरोबर उपयुक्त इलेक्ट्रोलाईट्ससुद्धा कमी होतात आणि मग चक्कर येणे, डोकं दुखणे, थकवा जाणवणे, चिडचीड होणे आणि अतिशय घाम येणे असे नानाविध त्रास होतात.
दरम्यान, अशा परिस्थितीत आपल्या आरोग्यासंबंधी आणि आहारासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण फ्रुट ज्यूस किंवा सॉफ्ट ड्रिंकसं सेवन करतो. आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी कोणती पेय तयार करता येतील याबाबत सांगणार आहोत.
लिंबू पाणी – लिंबू पाणी दिवसातून दोनवेळा प्यायल्याने सुद्धा तुमचं शरीर आरोग्य उत्तम होईल. लिंबू पाणी हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. जे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवतं. लिंबू पाणी शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतं आणि शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करत.
ताक (दही) – उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये ताक प्यायलं जातं. दह्यामध्ये मीठ, जिरा पावडर आणि चवीनुसार हिंग घालून ब्लेंडरमध्ये चांगल्या पद्धतीने ब्लेंड करुन घ्या. नंतर यामध्ये बर्फ घालून या थंडगार पेयाचा आस्वाद घ्या. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.
कैरीच पन्हे – कैरीच पन्हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी कैरीला चांगल्या पद्धतीने सोलून त्यामधील कोय काढुन त्याला गरम पाण्यात उकळुन घ्या. त्यानंतर यामध्ये काळ मीठ, चाट मसाला, पुदिना आणि साखर घालुन मिक्सर मध्ये त्याचा ज्युस करुन, एका ग्लासात बर्फाचे तुकडे घालून कैरी पन्हं प्या.
पुदिना सरबत – पुदिन्याचं सरबत हे ऊन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहाइड्रेशन वाचवतो, हे सरबत बनवताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळ मीठ, मिरपूड आणि जीरा पावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटुन घ्या. या तयार झालेल्या पेस्टला कमी पाण्यात मिक्स करा. पुदिन्याचा रस तयार आहे.