error: Content is protected !!
पुणे – उन्हाळ्यात आंबा, टरबूज, खरबूज, लिची अशी कितीही फळे खाल्ली तरी समाधान वाटत नाही. त्यांचे आईस्क्रीम मिळाले तर मजा येते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घरगुती ‘टरबूज आईस्क्रीम’ कशी बनवायची हे घेऊन आलो आहोत. हे बनवायला इतके सोपे आहे की तुम्ही त्याची रेसिपी वाचून बनवायला सुरुवात सुद्धा करू शकता…..
– टरबूज आईस्क्रीमसाठी लागणारे साहित्य
1 कप टरबूजचे तुकडे
चवीनुसार साखर
3 चमचे लिंबाचा रस
कुल्फी साचा
– अशी बनवा घरच्या घरी टरबूज आईस्क्रीम
प्रथम टरबूजाच्या बिया काढून घ्या.
नंतर साखर आणि टरबूजाचा लगदा मिक्सरमध्ये वाटून घ्या. लक्षात ठेवा मिश्रण घट्ट असावे.
गरज असल्यास रस गाळून घ्या.
आता रसामध्ये लिंबाचा रस घाला.
तयार रस एका पॉप्सिकल मोल्डमध्ये घाला आणि फ्रीजरमध्ये गोठण्यासाठी ठेवा.
6-7 तासांनंतर बाऊलमध्ये काढा आणि सर्व्ह करा.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar