पुणे – आता हळूहळू गोडगुलाबी थंडी जाऊन उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर आज आपण हा उन्हाळा सुरू होण्याआधीच उन्हाळ्यापासून सुरक्षेची तयारी कशी करून ठेवता येईल याकडे लक्ष देऊ या. उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीरावर घातक परिणाम होतात.
हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण साधारणपणे गरम पाण्याने अंघोळ करतो, कारण थंडी कमी होऊन गरम वातावरण निर्माण होते.
पण हेच तुम्ही उन्हाळ्यात करत असाल तर तुम्हाला त्वचेच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.
अवयवाची, नसांची, त्वचेची, हाडांची तसेच प्रत्येक शारीरिक गोष्टीची एक मर्यादा असते. त्यामुळे अशा वातावरणात गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
जास्त गरम पाण्याने तुम्ही अंघोळ करत असाल तर लक्षात घ्या की त्वचेची एका मर्यादेपर्यंत गरम पाणी सहन करण्याची क्षमता असते. या क्षमतेपलीकडे गरम पाणी असले तर तुमच्या त्वचेला मोठे नुकसान होते.
त्वचेच्या अगदी पृष्ठभागावर असणाऱ्या पेशींना धोका निर्माण होऊन त्या मरतात. तसेच त्वचेवर खवले येणे, त्वचा उलने, त्वचा रुक्ष होणे यासारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.