Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

उन्हाळ्यात एसी, फ्रीजमुळे येतं जास्त वीजबिल? फक्त ‘हे’ काम करा आणि फायद्यात राहा!

by प्रभात वृत्तसेवा
April 6, 2022
in लाईफस्टाईल
A A
उन्हाळ्यात एसी, फ्रीजमुळे येतं जास्त वीजबिल? फक्त ‘हे’ काम करा आणि फायद्यात राहा!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उन्हाळा सुरू झाला आहे. यंदाच्या कडाक्याच्या उन्हाने मागील हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अशा परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये एसी, फ्रीज, पंख्याचा वापर करतात.  मात्र, एसी आणि फ्रीज वापरल्यामुळे खूप वीज लागते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी जर तुमचे वीज बिल जास्त येऊ लागले तर तुम्हाला खूप खर्च करावा लागेल. चला,  आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्यावर तुमचे वीज बिल खूपच कमी होईल. या टिप्सचे अनुसरण केल्यास एसी आणि फ्रीज वापरल्यानंतरही, तुमचे वीज बिल खूप कमी होईल. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

* 5 स्टार रेटिंगवाला एसी वापरा

जर तुम्ही उन्हाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन नवीन एसी घेणार असाल, तर तुम्ही 5 स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करा. 5 स्टार रेटिंग असलेले एसी वीज बिलाचा वापर लक्षणीयरीत्या कमी करतात. यामुळे ते खरेदी केल्यानंतर तुमच्या घराचे वीज बिल जास्त येणार नाही. अशा प्रकारे, आपण खूप पैसे वाचवाल.

5 स्टार रेटिंग असलेले एसी खूप ऊर्जा वाचवतात. या कारणास्तव, एसी खरेदी करताना, तुम्ही 5 स्टार रेटिंग असलेल्या एसीला प्राधान्य द्यावे. याशिवाय एसीचे तापमान जास्त-कमी करू नये. असे केल्याने तो मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करतो. एसी वापरताना त्याचे तापमान २५ डिग्री सेल्सियस ठेवा.

* जर तुम्ही रेफ्रिजरेटर घेणार असाल तर 5 स्टार रेटिंग असलेला फ्रीज घेण्याचा प्रयत्न करा. याशिवाय फ्रीजच्या वर कधीही मायक्रोवेव्ह ठेवू नये. असे केल्याने तुमची वीज जास्त वापरली जाणार नाही. याशिवाय तुम्ही तुमचा फ्रीज थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा. रेफ्रिजरेटर अशा ठिकाणी ठेवा, जेथे हवेचा प्रवाह कायम राहील.

* वीज बिलात बचत करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात स्मार्ट पंखे देखील लावू शकता. 

* जर तुमचे बजेट चांगले असेल तर सोलर पॅनेल घरी बसवण्याचा प्रयत्न करा. सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला वीज बिलाच्या ताणापासून पूर्ण मुक्ती मिळेल. भारतातील वाढत्या वीज बिलाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवत आहेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar