Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

इस्रोच्या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ; क्रायोजेनिक इंजिन असक्रिय

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2021
in लाईफस्टाईल
A A
इस्रोच्या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ; क्रायोजेनिक इंजिन असक्रिय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

श्रीहरीकोटा- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ने अवकाशात सोडलेल्या “इओएस-03’या निरीक्षक उपग्रहाचे प्रक्षेपण आज अपयशी ठरले. रॉकेटमधील क्रायजेनिक इंजिन सुरू होण्यास अडचण आल्यामुळे हे प्रक्षेपण अपयशी ठरले. या प्रक्षेपणामध्ये अपेक्षित यश मिळू शकलेले नाही, असे इस्रोने जाहीर केले आहे.

या रॉकेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील काम अपेक्षेप्रमाणे झाले होते. मात्र लॉंच व्हेईकलमधील क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे प्रक्षेपण अपयशी ठरले, असे इस्रोने म्हटले आहे. 

Watch Live: Launch of EOS-03 onboard GSLV-F10 https://t.co/NE3rVjNtHb

— ISRO (@isro) August 11, 2021

जीएसएलव्ही-एफ 10 या लॉंच व्हेईकलमधून ठरलेल्या वेळी म्हणजे 5 वाजून 43 मिनिटांनी प्रक्षेपण झाले होते. पहिल्या दोन टप्प्यांचे काम व्यवस्थित पार पडले. मात्र क्रायोजेनिक इंजिन प्रक्षेपणानंतर 4 मिनिट 56 सेकंदांनंतर सक्रिय होणे अपेक्षित होते. पण तांत्रिक कारणामुळे ते सक्रिय झाले नाही, असे इस्रोने म्हटले आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वारंवार अडथळे…
करोनाच्या साथीमुळे इस्रोच्या मोहिमांमध्ये खंड पडला होता. या मोहिमेमुळे इस्रोच्या मोहिमा पुन्हा सुरू होणार होत्या. या रॉकेटच्या माध्यमातून ईओएस हा उपग्रह अवकाशात सोडला जाणार होता.

हा उपग्रह यापूर्वी गेल्यावर्षी 5 मार्च रोजी अवकाशात सोडला जाणार होता. मात्र तांत्रिक कारणामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते.

त्यांनंतर यावर्षी 28 मार्च रोजी हे प्रक्षेपण करण्याचे ठरले होते. मात्र किरकोळ कारणामुळे पुन्हा एकदा हे प्रक्षेपण पुढे ढकलावे लागले होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar