नवी दिल्ली – भारतात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि विक्री वाढण्यासाठी अतिशय पूरक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या संख्येने होणार आहे. त्यामुळे या वाहनांच्या किमती वेगाने कमी होतील. एक वेळ अशी येईल की इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनापेक्षा कमी हातील असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे.
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनाबरोबरच पर्यायी इंधनासाठी भारतातील कंपन्या आणि केंद्र सरकार व्यापक उपाययोजना करीत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये पर्यायी इंधनाचा मोठा स्त्रोत भारत तयार होणार आहे असे गडकरी म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनासाठी भारत सरकारने उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू केली आहे. भारतातील विविध कंपन्यांनी भारतामध्ये या वाहनांची निर्मिती वाढविली आहे. एवढेच नाही तर भारतातील ग्राहक पर्यावरण संतुलनासाठी संवेदनशील झाले असून सध्या त्यांच्याकडून या वाहनांची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये विक्री वाढून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वेगाने कमी होऊ शकतात असे गडकरी यांना वाटते.
टेस्ला सारख्या कंपन्यांनी आताच भारतामध्ये निर्मिती करण्यास सुरुवात केली तर त्यांच्या उत्पादनांची विक्री भारतात वाढण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा त्या कंपन्यांना होईल. या अगोदर 26 एप्रिल रोजी गडकरी यांनी या कंपनीने भारतात उत्पादन केल्यास आम्हाला काही हरकत नाही असे म्हटले होते. मात्र कंपनीने चीनमध्ये उत्पादन करून भारतात विक्री करू नये असा सल्ला त्यांनी दिला होता.
कंपनी भारतात इतके उत्पादन करावे की त्यामुळे भारतीय ग्राहकांची गरज भागेल त्याचबरोबर भारतातून टेस्ला कंपनीला निर्यातही करता येऊ शकेल असे गडकरी यांनी सांगितले होते. गेल्या वर्षीही गडकरी यांनी टेस्लाला भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र 40 हजार डॉलरपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारवर सध्या भारत सरकारने जो कर लावला आहे तो कर कमी करण्याची विनंती टेस्ला कंपनीने केली होती. मात्र जोपर्यंत ही कंपनी भारतात उत्पादन करणार नाही. तोपर्यंत सवलती दिल्या जाणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली आहे.
error: Content is protected !!