Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

इन्स्टाग्रामवर येणारे नवीन फिचर करणार अमेझॉन-फ्लिपकार्टची सुट्टी!

by प्रभात वृत्तसेवा
July 20, 2022
in लाईफस्टाईल
A A
इन्स्टाग्रामवर येणारे नवीन फिचर करणार अमेझॉन-फ्लिपकार्टची सुट्टी!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई : आणखी एक नवीन फीचर आता मेटा-मालकीच्या ऍप इंस्टाग्रामवर येत आहे, ज्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामवरच खरेदी करू शकाल. इंस्टाग्रामवर एक नवीन पेमेंट फीचर येत आहे, ज्याच्या मदतीने छोटे व्यवसाय डायरेक्ट मेसेजद्वारे त्यांचा व्यवसाय करू शकतील. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये नवीन फीचरची माहिती दिली आहे.

ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, टाइमलाइनवर दिसणार्‍या कोणत्याही उत्पादनावर क्लिक करून, थेट चॅटबॉक्समधून खरेदी करता येते, तथापि, यासाठी मेटा पेचा वापर करावा लागेल. भविष्यात इतर कोणत्याही पेमेंट सिस्टमला सपोर्ट मिळेल की नाही याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. यापूर्वी 2020 मध्ये मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर उत्पादनाची विक्री करण्याची सुविधा दिली होती.

गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामने सब्सक्राइबर चॅट, सब्सक्राइबर रील, सब्सक्राइबर पोस्ट आणि सब्सक्राइबर होम सादर केले. सबस्क्राइबर होम टॅब अंतर्गत, वापरकर्ते केवळ त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या पोस्ट फिल्टर करण्यास सक्षम असतील.

काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामने एक नवीन अपडेट जारी केले आहे, ज्यानंतर तुम्ही आता तुमच्या प्रोफाइलमध्ये तीन पोस्ट किंवा कोणत्याही तीन रील पिन करू शकाल म्हणजेच प्रोफाइलच्या शीर्षस्थानी दाखवू शकाल. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या सर्वोत्तम तीन पोस्ट किंवा रील पिन करू शकता. हे फीचर फेसबुक पेजच्या पिन टू टॉप सारखे आहे. हे फीचर ट्विटर आणि टिकटॉकमध्ये आधीपासूनच आहे.

जर तुम्हाला तुमची कोणतीही पोस्ट किंवा रील पिन करायची असेल तर प्रथम त्या रीलवर जा आणि बाजूला दिसणार्‍या तीन ठिपक्यांवर क्लिक करा आणि नंतर तुमच्या प्रोफाइलला पिन करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर, ती पोस्ट किंवा रील तुमच्या प्रोफाइलच्या डाव्या कोपर्‍यात ग्रिडमध्ये दिसतील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar