
इंटरनेटशिवायही वापरता येते व्हॉट्सऍप! वाचा कसे…
October 22nd, 5:28pmOctober 22nd, 5:28pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
सध्याच्या युगात इंटरनेटशिवाय कोणतेही काम अशक्य वाटते. स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप जर लोकांच्या आयुष्यातून दूर गेले, तर बरेच लोक ‘वेडे’ वगैरे देखील होऊ शकतात कारण लोकांना आता याची सवय नाही, तर व्यसनच लागले आहे.
घरी बसून गुगलवरून कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवायची किंवा आवडते व्हिडिओ, चित्रपट वगैरे बघायचे, हा बऱ्याच लोकांचा आवडता टाईमपास असतो. जर तुमच्याकडे इंटरनेट असेल तर हे सर्व घरी बसून शक्य आहे. आता बहुतांश लोकांनी स्मार्टफोन वापरणे सुरू केले आहे आणि स्मार्टफोन असणे म्हणजे त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुमचा फोन पाण्याशिवाय माशासारखा भासेल.
स्मार्टफोन आणि इंटरनेट, जर तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील, तर त्या नंतर व्हॉट्सऍप सर्वात महत्वाचे बनते. साधारणपणे लोकांना वाटतं की व्हॉट्सऍप चालवण्यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे, तर तसे अजिबात नाही. तुम्ही इंटरनेटशिवायही व्हॉट्सऍप वापरू शकता. कसे? चला, जाणून घेऊ.
* बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये इंटरनेटच्या अभावामुळे लोकांना प्रश्न पडतो की व्हॉट्सऍपवर कोणाला फोटो किंवा व्हिडिओ कसा पाठवायचा? तर यासाठी एक पद्धत आहे, जी तुम्ही वापरू शकता. चला, या पद्धतीबद्दल जाणून घेऊया.
* इंटरनेटशिवाय व्हॉट्सऍप वापरण्यासाठी तुम्हाला एक विशेष सिम कार्ड विकत घ्यावे लागेल, ज्याचे नाव ‘चॅटसिम’ आहे. तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर किंवा चॅटसिमच्या वेबसाईटला भेट देऊनही हे सिम खरेदी करू शकता.
* चॅटसिमची किंमत 1,800 रुपये आहे आणि त्याची एक वर्षाची वैधता आहे, म्हणजेच 1,800 रुपयांमध्ये तुम्ही हे सिम एक वर्षासाठी वापरू शकता आणि इंटरनेटशिवाय व्हॉट्सऍप, फेसबुक मेसेंजर, वीचॅट, टेलिग्राम सारखे ऍप्स वापरू शकता. एक वर्षानंतर हे सिम पुन्हा रिचार्ज करणे आवश्यक आहे.
* चॅटसिमचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केले जाते आणि ते देश-परदेशात सर्वत्र काम करेल, म्हणजेच तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही चॅटसिमच्या माध्यमातून व्हॉट्सऍपवर नेहमी सक्रिय राहू शकता.