Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

इंजेक्‍शनद्वारे स्थूलपणावर मात करता येणे शक्‍य होणार

by
December 1, 2022
in आरोग्य वार्ता
A A
इंजेक्‍शनद्वारे स्थूलपणावर मात करता येणे शक्‍य होणार
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जगभरातील अनेक लोकांना स्थूलपणाची समस्या भेडसावत आहे. आपले वजन कमी कसे करायचे याची चिंता जगातील अनेक लोकांना लागली असतानाच आता इंग्लंडमधील काही शास्त्रज्ञांनी यावर एक उपाय शोधला आहे. केवळ इंजेक्‍शनद्वारे स्थूलपणावर मात करता येणे शक्‍य होणार आहे. दर आठवड्याला एक इंजेक्‍शन घेऊन ही उपचार पद्धती राबवण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगभरातील 70 कोटी लोकांना स्थूलपणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे अनुषंगिक आजार होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अनेक लोक आपले वजन कमी करण्याकडे आता लक्ष देत आहेत. अनेक उपाययोजना करूनही वजन कमी होत नाही, असा अनुभव अनेकांना येतो. पण आता ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या इंजेक्‍शनमुळे सहजपणे स्थूलपणावर मात करता येणार आहे.

या इंजेक्‍शनचे नाव सेमाग्लुटाइड असे असून हे इंजेक्‍शन टोचल्यानंतर संबंधित व्यक्तीची भूक काही प्रमाणात कमी होते. आहाराचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपोआपच वजनावर नियंत्रण होते. सेमाग्लुटाईड तसं नवीन औषध नाही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांच्यावर या औषधाचा वापर केला जातो, पण आता स्थूलपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथमच या इंजेक्‍शनचा वापर करण्यात येणार आहे. ब्रिटनमधील या संशोधकांनी तब्बल दोन हजार लोकांवर प्रयोग करून संशोधनाचे निष्कर्ष समोर आल्यानंतर हे इंजेक्‍शन वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत लेख न्यू जर्नल ऑफ मेडिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झाला असून ब्रिटनच्या ड्रग कंट्रोल संस्थेने इंजेक्‍शनला परवानगी दिली आहे. या इंजेक्‍शनची चाचणी सुरू असताना दोन हजार लोकांपैकी 32 टक्‍के लोकांना आपले वजन तब्बल 15 ते 20 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचा अनुभव आला. चाचणीमध्ये सहभागी झालेल्या बहुतेकांचे वजन 15 किलोने कमी झाल्याचे निष्कर्ष समोर आले. त्यामुळे आता हे इंजेक्‍शन लवकरच नियमितपणे वापरात येणार आहे.

The post इंजेक्‍शनद्वारे स्थूलपणावर मात करता येणे शक्‍य होणार appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar