Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : हिवाळ्यात तीळाचे पदार्थ नक्की खा

by
January 18, 2023
in आरोग्य वार्ता
A A
आहार : हिवाळ्यात तीळाचे पदार्थ नक्की खा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तीळाचे छोटे दाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. तीळ खाल्ल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. आरोग्यासोबतच तिळालाही देशात सांस्कृतिक महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ-गूळ आणि खिचडी दान केली जाते. या थंडीच्या मोसमात शरीराला अंतर्गत उष्णता देण्यासाठी तिळाची शिफारसही आरोग्यतज्ज्ञ करतात. त्यामुळेच या हंगामात तीळ आणि गुळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे.

तिळाचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. हे हजारो वर्षांपासून लोक औषधांमध्येही वापरले जात आहे. हृदयविकार, मधुमेह आणि संधिवात यांसारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासोबतच तीळ पचनाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे.

फायबर पचनासाठी फायदेशीर
-तीळ हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. तीन चमचे (30 ग्रॅम) तिळापासून सुमारे 3.5 ग्रॅम फायबर मिळू शकते. तिळाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते, जे पचनाच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर असते. फायबर तुम्हाला हृदयविकार, विशिष्ट प्रकारचे कर्करोग, लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी देखील ओळखले जाते.

कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्‌समध्ये फायदेशीर
– तीळ नियमितपणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्‌सची पातळी कमी होण्यास मदत होते. हृदयविकारासाठी हे प्रमुख जोखीम घटक आहेत. तिळात 15% सॅच्युरेटेड फॅट, 39% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि 41% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. अभ्यास दर्शविते की पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्‌सचे उच्च सेवन कोलेस्टेरॉल कमी करून हृदयरोग टाळू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी तीळ फायदेशीर
– रक्तातील साखरेची समस्या कमी करून, मधुमेहाच्या इतर गुंतागुंतांपासून संरक्षण करण्यासाठी तिळाचे सेवन फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.

तिळाच्या बियांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते आणि ते प्रथिने आणि निरोगी चरबीने समृद्ध असल्याचे आढळले आहे, जे मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्‍त, अभ्यासातून असे दिसून आले आहे की या बियांमध्ये पिनोरेसिनॉल नावाचे संयुग असते जे पाचक एंझाइम माल्टेजची क्रिया रोखून रक्‍तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करते.

तीळ रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्‍त आहे.
-रोगप्रतिकारकशक्‍त वाढवण्यातही तीळ महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये झिंक, सेलेनियम, कॉपर, लोह, व्हिटॅमिन-बी6 आणि व्हिटॅमिन ई असते. हे पोषक घटक रोगप्रतिकारकशक्‍ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. यामध्ये असलेले झिंक पांढऱ्या रक्‍तपेशी वाढवून रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यास मदत करते. मजबूत प्रतिरक्षा प्रणालीसह, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे सोपे आहे.

The post आहार : हिवाळ्यात तीळाचे पदार्थ नक्की खा appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar