Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरता

by
April 23, 2023
in आरोग्य वार्ता
A A
आहार : व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरता
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांची आवश्‍यकता असते. यासाठी, सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे सहजपणे पुरवू शकणारे पदार्थ निवडण्याचा सल्ला दिला जातो, पण शरीराला आवश्‍यक असणारी ही सर्व पोषकतत्वे सर्व लोकांना आहारातून मिळू शकतात का? तर उत्तर आहे, नाही. अभ्यास आणि अहवाल सूचित करतात की उत्तर भारतातील 47 टक्‍के लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता आहे. भारतातील 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रौढांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता दिसून येते.

व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. व्हिटॅमिन बी-12 (सामान्यतः फोलेट म्हणतात) च्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो. या स्थितीत अति थकवा, ऊर्जेचा अभाव (आळस), श्‍वास लागणे, मूर्च्छा येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्‌भवू शकतात. आहारात काही गोष्टींचा समावेश करून या जीवनसत्त्वाची गरज सहज पूर्ण करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे.

डेअरी उत्पादनातून बी-12
दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ जसे की दही आणि चीज, प्रथिने तसेच व्हिटॅमिन बी-12 आणि इतर विविध खनिजे यांचा चांगला स्रोत आहेत. एक कप (240 मिली) दूध व्हिटॅमिन बी- 12 साठी दैनंदिन गरजेच्या 46 टक्‍के पुरवते. याशिवाय 100 ग्रॅम पनीरमध्ये 800 मिलीग्राम व्हिटॅमिन बी-12 असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करून तुम्ही त्याची कमतरता दूर करू शकता.

मशरूमचे फायदे
मशरूममध्ये विविध प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश असतो, त्यापासून व्हिटॅमिन बी-12 देखील मिळवता येते. 100 ग्रॅम मशरूमपासून ते 5.6 मायक्रोग्रॅम प्रमाणात पुरवले जाऊ शकते. याशिवाय प्रथिने आणि कॅल्शियमसारख्या पोषक घटकांसाठी आहारात मशरूमचा समावेश करणे देखील फायदेशीर मानले जाते. शाकाहारी लोकांसाठी मशरूम खाणे विशेषतः फायदेशीर मानले जाते.

अंडी आरोग्यासाठी उपयुक्त
अंडी सामान्यतः त्यांच्या प्रथिनांसाठी ओळखली जातात; परंतु तुम्हाला माहीत आहे का, की 100 ग्रॅम अंडी तुमची 46 टक्‍के व्हिटॅमिन-बी12 ची रोजची गरज पूर्ण करू शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची पातळी अंड्याच्या पांढऱ्यापेक्षा जास्त असते. अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये असलेले इ12 शरीराला शोषून घेणे देखील सोपे आहे. आहारात अंड्यांचा समावेश करणे आवश्‍यक आहे.

बी-12 साठीची फळे
अनेक प्रकारच्या फळांमध्ये व्हिटॅमिन बी-12 मुबलक प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ, बी-12 व्यतिरिक्त, सफरचंद देखील अँटिऑक्‍सिडंट्‌स, फ्लेव्होनॉइड्‌स आणि फायबरने समृद्ध असतात. त्याचप्रमाणे, केळी हे व्हिटॅमिन-बी12 समृद्ध फळांपैकी एक आहे. अननस आणि अंजीरमध्येही या पोषक तत्वांचे प्रमाण आढळते. या फळांचा आहारात समावेश करणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

The post आहार : व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरता appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar