Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : लिंबाच्या रसाचे भन्नाट फायदे

by
February 22, 2023
in आहार
A A
आहार : लिंबाच्या रसाचे भन्नाट फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यांच्या वापराने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून मुक्‍ती मिळू शकते आणि अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. या खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे लिंबू. लिंबू अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांपासून आरोग्याशी संबंधित इतर समस्यांमध्ये तुम्ही लिंबू वापरू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. लिंबू हे आयुर्वेदातील एक फार महत्त्वाचे फळ मानले जाते, जे

सर्वोत्कृष्ट रोगमारक आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे फळ म्हणून तज्ज्ञांनी ओळखले आहे. लिंबाचा वापर घरगुती उपाय आणि औषध म्हणून केला जातो.
अनेक प्रकारच्या वेदनांवरही लिंबू फायदेशीर आहे. पोटदुखी किंवा दातदुखी, सांधे आणि कान दुखण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो. तसेच पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी कोवळी, जिरे आणि साखर समप्रमाणात बारीक वाटून घ्या. मीठ आणि थोडासा लिंबाचा रस एकत्र करून कोमट पाण्यासोबत खा. शिवाय दातांमध्ये दुखत असल्यास 3-4 लवंगा बारीक करून त्यात लिंबाचा रस टाका आणि दुखत असलेल्या दातावर लावा आणि हलक्‍या बोटाने चोळा. जर तुम्ही सांधेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबाच्या रसाने मालिश करणे किंवा लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरते.

पोषक तत्त्वांनी युक्‍त लिंबूचे अनेक फायदे आहेत. पोटाच्या समस्येवर लिंबू फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.
बद्धकोष्ठता- जर तुम्हाला पचन किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दोन ग्लास पाण्यात एक लिंबू आणि थोडे मीठ टाकून प्या. संध्याकाळी लिंबू मिठाचे पाणी देखील प्या. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
उलट्या- याशिवाय उलट्या होत असतील तर अर्धा कप पाण्यात लिंबाचा रस, जिरे आणि वेलचीचे दाणे मिसळून प्या. दोन तासांच्या अंतराने ते प्यायल्याने उलट्या थांबतात.
आंबट ढेकर येणे- खाण्याच्या योग्य सवयी नसल्याने अन्नाचे पचन होत नाही, त्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि आंबट ढेकर येणे सुरू होते. यापासून सुटका करण्यासाठी पेयामध्ये लिंबाचा रस, साखर आणि थोडे मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

चेहऱ्यावरील पुरळ काढणे
त्वचेवर डाग आणि मुरुमांच्या समस्येने लोक अनेकदा त्रस्त असतात. त्याचा स्वस्त आणि फायदेशीर उपाय म्हणजे लिंबू. एक चमचा मलईमध्ये एक चतुर्थांश लिंबू पिळून घ्या आणि दररोज चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याचा रंग साफ होतो आणि मुरुमांपासूनही आराम मिळतो. साधारण महिनाभर असे केल्याने तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.
वजन कमी करणे
लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस आणि दोन चमचे मध मिसळून सेवन केल्याने वजन कमी होते.

केस गळणे
टक्‍कल पडण्याची तक्रार असेल तर लिंबू खूप फायदेशीर ठरते. यामुळे केस गळणे थांबते. पिकलेल्या केळ्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि नियमितपणे डोक्‍याच्या मुळांवर लावा.
टक्‍कल पडणे
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यास कोंडा दूर होतो आणि केस काळे आणि लांब होतात.

-=======================

The post आहार : लिंबाच्या रसाचे भन्नाट फायदे appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar