Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

by
January 18, 2023
in आरोग्य वार्ता
A A
आहार :  रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आहाराद्वारे शरीराला अनेक प्रकारच्या पोषकतत्त्वांची नियमित गरज असते. लोह हा असाच एक घटक आहे. लाल रक्‍तपेशी तयार करण्यासाठी लोह आवश्‍यक आहे, जे संपूर्ण शरीरात ऑक्‍सिजन वाहून नेण्यास मदत करते. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्‍तपणा होऊ शकतो, ज्यामुळे लोकांना थकवा, ऊर्जेचा अभाव आणि फिकट त्वचा यासह विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

सर्व लोकांनी अन्नामध्ये लोहयुक्‍त पदार्थांचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून शरीरासाठी त्याची गरज भागवता येईल. साधारणपणे ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांना खूप अशक्‍तपणा येतो आणि चक्‍कर येते. या लक्षणांव्यतिरिक्‍त, तोंड आणि जिभेत उद्‌भवणाऱ्या काही समस्या देखील या पोषकतत्त्वाची कमतरता दर्शवू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे
लोहाच्या कमतरतेचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. वेळेत अशक्‍तपणाच्या स्थितीकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा यामुळे गंभीर समस्या उद्‌भवू शकतात. सर्वसाधारणपणे, लोहाच्या कमतरतेमुळे अत्यंत थकवा-अशक्‍तपणा, त्वचेचा फिकटपणा, अनियमित हृदयाचे ठोके, वारंवार थंड हात आणि पाय आणि त्वचेत बदल होऊ शकतात.

तोंडाच्या या लक्षणांकडे लक्ष द्या
शरीरात लोहाच्या कमतरतेची चिन्हे तोंडात अनेक बदलांच्या आधारे देखील दिसू शकतात. लोहाच्या कमतरतेमुळे अन्नातील विचित्र चवीची समस्या उद्‌भवू शकते. याशिवाय तोंडाला लाल भेगा पडणे, अनेकदा ओठ फाटण्याची समस्याही कायम राहते. लोहाची कमतरता असलेल्या लोकांमध्ये वारंवार तोंडात अल्सर होण्याची समस्यादेखील सतावत असते.

पांढऱ्या तोंडाव्यतिरिक्‍त जिभेच्या रंगात काही बदल झाल्यामुळे लोहाची कमतरता ओळखली जाऊ शकते. अशा स्थितीत, जीभ सुजलेली, पिवळी, वेदनादायक आणि विचित्रपणे स्निग्ध वाटू शकते. जिभेचा रंग हलका गुलाबी ते पांढरा बदलणे देखील ही समस्या दर्शवू शकते. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक ठरतो.

लोहाची कमतरता कशी दूर करावी?
काही साध्या गोष्टींचा आहारात समावेश करून लोहाची रोजची गरज भागवता येते. शरीरात ऑक्‍सिजनचे संतुलन चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहार आवश्‍यक आहे. मांस, मासे, पालक, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन लोहासाठी फायदेशीर आहे. याशिवाय, हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या, मनुका आणि जर्दाळू देखील पूरक असू शकतात.

The post आहार : रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar