मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोराईड मिळून मीठ तयार होते. दोघांचे प्रमाण 40:60 असते. मानवी शरीरात दररोज 10 ते 15 ग्राम मिठाची आवश्यकता असते. हवामानानुसार यात बदल होऊ शकतो. तरीसुद्धा काहीजण मीठ जास्त खातात आणि अनेक आजाराला बळी पडतात. मीठ पाण्याला धरून ठेवते म्हणून जास्त मीठ खाल्ले तर अनैसर्गिक तहान लागते. जेवताना वरून मीठ घेऊ नये म्हणजे मीठ जास्त खाण्याची सवय जाते. प्रामुख्याने शरीरात सोडियम आणि क्लोराईडचे प्रमाण कायम ठेवण्याचे कार्य मिठामार्फत केले जाते.
आजकाल बदलत्या जीवनशैलीमध्ये मिठाचा वापरदेखील वाढलेला आहे. जास्तीत जास्त रिफाईंड मिठाचा वापर घरोघरी, हॉटेलमध्ये होत आहे; परंतु रिफाईंड मीठ जास्त प्रमाणात खाणे हे आरोग्यास घातक आहे. पूर्वी घरोघरी जास्तीत जास्त सैंधव मिठाचा वापर केला जात होता जे आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील मानवी शरीरास फायदेशीर ठरत होते.
काही ठराविक कुटुंबात आजही सैंधव किंवा समुद्री मिठाच्या खड्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मीठ सांगितले आहेत. सैंधव मीठ, काळे मीठ, बीड मीठ, समुद्री मीठ आणि साभर मीठ. मीठ जास्त झाले तर मानवी शरीरातील त्रिदोष म्हणजेच वात पित्त आणि कफ समतोल राहात नाही. त्यामुळे अनेक भयंकर आजारांना बळी पडावे लागते. एग्जिमा, त्वचारोग, तसेच रक्तदाबासारख्या भयंकर आजारदेखील होऊ शकतो.
रिफाईंड मिठाच्या अतिप्रमाणामुळे मूत्रपिंडावर देखील घातक परिणाम होऊ शकतो. यकृताचा काही त्रास असल्यास देखील मीठ कमी घेतले पाहिजे, जास्त मीठ खाल्ल्याने केस गळतीही होऊ शकते. शक्यतो, सैंधव मिठाचा वापर करावा जे आता बाजारात पावडरमध्ये देखील उपलब्ध आहे. समुद्री खडे मिठाचा वापर करावा, रुग्णाला पचनशक्ती किंवा शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यास काळ्या मिठाचा वापर करावा. सैंधव मीठ श्वसनसंस्थेसाठी खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. गरम पाण्यात सैंधव मीठ घेऊन गुळण्या केल्याने खूप फायदा होतो.
शरीरातील मांसपेशींसाठी देखील सैंधव मीठ उपयुक्त आहे. गरम तेलामध्ये सैंधव मीठ टाकून मसाज केल्याने मांसपेशींच्या वेदना कमी करण्यास मदत होते. समुद्री मीठ आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढवू शकते. ज्याचा दुष्परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो व त्यामुळे रक्तदाबसारख्या भयंकर आजाराला सामोरे जावे लागते. म्हणजे दैनंदिन आहारात रिफाईंड समुद्री मिठाचा वापर करण्याऐवजी सैंधव मिठाचा वापर नक्कीच उपयोगी ठरेल. ( Arogya Jagar, diet , सैंधव मीठ मीठ , सोडियम )
सैंधव मीठ वजन कमी करण्यासाठीसुद्धा सहायक औषधी म्हणून उपयोगात येते. सांध्याच्या मजबुतीसाठी सैंधव मीठ फायदेशीर आहे. सैंधव मीठ आणि पाणी त्वचेला लावून मसाज केल्याने त्वचा तजेलदार बनते, त्वचेवरील मृतत्वचेचा पडदा निघून जातो त्वचा तेजस्वी बनते. लिंबू पाण्यात सैंधव मीठ टाकून घेतल्याने पोट दुखणे किंवा पोटात कळ येणे यावर योग्य उपाय होऊ शकतो. सैंधव मीठ आपल्या शरीरात पेशींना मिनरल्स पोहोचविण्याचे कार्य करते. ( Arogya Jagar, diet , सैंधव मीठ मीठ , सोडियम )
The post आहार : मीठचा योग्य वापर appeared first on Dainik Prabhat.