पालेभाज्यांमधील औषधी गुण
पालेभाज्यांबद्दल बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो तो असा की, पालेभाज्या म्हणजे गवत नी त्यातही जीवजंतू असतातच. त्यामुळे त्यांना पालेभाज्यांचं महत्त्वच पटत नाही. त्या आपल्या आहारात पाहिजेतच, असंही काहींना वाटत नाही. पण जसा आयुर्वेदाचा प्रचार झाला तसे पालेभाज्यांमध्ये किती उपयुक्त अन्नघटक आहेत याचे महत्त्व लोकांना पटू लागले आणि पालेभाजी दिवसाआड आहारात हवीच अशा विचार प्रवाहाचा प्रचार होऊ लागला.
क्लोरोफिल :
पालेभाजीत क्लोरोफिल नावाचा प्रभावी जंतुनाशक घटक असतो. हा घटक दातांत अडकलेल्या अन्नकणांचं निर्मूलन करतो आणि दातांत कीड निर्माण होऊ देत नाही. क्लोरोफिल नुसत्या दातातीलच नव्हे तर शरीरातील, आतड्यातील निरुपयोगी जंतूंचाही नाश करतो. क्लोरोफिलमध्ये उच्च प्रतीचे भरपूर प्रोटीन असते. जे लोक रसाहार घेतात अशांना भरपूर प्रोटीनची आवश्यकता असते. ते प्रोटीन त्यांना पालेभाज्यांच्या रसामधून मिळते.
लोह :
ताज्या पालेभाजीमध्ये लोहही भरपूर असते. आपल्या आरोग्याला लोहाची अत्यंत गरज असते ती गरज पालेभाज्यांच्या रसातून भागवली जाते. विशेषतः पांडुरोगामध्ये जो अशक्तपणा येतो त्यावर हे लोह अधिक उपयुक्त ठरते.
क्षार :
आहारपालेभाज्यांमध्ये भरपूर क्षार असतात. ते पोटातील आम्लता कमी करतात. आपल्या शरीरातील रक्ताला क्षाराची फार गरज असते. म्हणून पालेभाज्यांच्या रस आपल्या आहारातून जाणं फार महत्त्वाचं आहे.
पालेभाज्या खा पण काळजीपूर्वक:
पालेभाज्या खाताना काही कच्च्या तर काही शिजवून खाव्यात. विशेषतः ज्यांच्या आतड्यांना व्रण पडले असतील त्यांनी पालेभाज्यांमधील रेषांचा भाग खाणं टाळावं. अशांनी तो भाग काढून पालेभाजीचा रस पिणे आरोग्याला चांगले. ज्यांना पातळ जुलाब, मुरडा किंवा संग्रहणीचा त्रास होत असेल किंवा ज्यांचे पोट नाजूक आहे, त्यांनी पालेभाज्यांचा समावेश वारंवार करू नये. ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी पालक खाणे टाळावे कारण त्यात ऑक्झिलेट्चे प्रमाण अधिक असते. आपण आता विविध विविध पालेभाज्यांमध्ये काय काय गुणधर्म, घटक असतात आणि त्यांचा आपल्या शरीराला कसा उपयोग आहे, निरनिराळ्या आजारांवर त्या कशा औषधी आहेत ते पाहूयात.
The post आहार : पालेभाज्या आणि वनौषधींचे रस appeared first on Dainik Prabhat.