कोथिंबीर – उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदयरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
कढीलिंब – पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.
पालक – मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सुजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.
माठ – हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्ल्यावर शौचाला साफ होते.
चाकवत – ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.
हादगा -खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.
अळू – याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरीराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.
अंबाडी – मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.
घोळ – मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.
टाकळा -सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.
मायाळू – अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी हेते. लहान मुलांना थंडी, खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.
The post आहार : पालेभाज्यांचे औषधी उपयोग appeared first on Dainik Prabhat.