पुदिना ही औषधी वनस्पती 1500 ते 3000 मीटर उंचीवर काश्मीरमध्ये सापडते. नरम आणि चांगली निचरा होणारी जमीन पुदिन्याला अनुकूल असते. त्याची लहान-लहान रोपे जमिनीवर पसरतात व ठिकठिकाणी त्याला मुळे फुटतात. पुदिन्याच्या देठांचा रंग लाल असतो. त्याची पाने तुळशीसारखी असतात; परंतु काही पाने लहान व गोलही असतात. पुदिन्याची मूळ असणारी देठे जमिनीत लावली जातात.
पुदिना उन्हाळ्यात चांगला पसरतो. पुदिन्याच्या रोपांना एक सुंदर वास असतो. ज्या घरात सतत पुदिन्याचा वास आहे. त्या घरात सर्दी वाऱ्यालाही उभी राहात नाही. अपचनावर पुदिना उत्तम औषध आहे. पुदिन्याच्या रसाच्या सेवनाने छातीत भरलेला कफ मोकळा होऊन दम्यामध्ये व तीव्र श्वासामध्ये आराम मिळतो. बहुधा मेन्था या जातीची स्थानिक भारतीय नावे पुदिना या शब्दावरून घेण्यात आलेली आहेत किंवा पुदिना नावाने ओळखली जातात. मेन्था या प्रजातीतील झाडे सुवासिक औषधी आहेत, अनेक जाती नैसर्गिकरित्या उगवतात; काही लावली जातात. या झाडातील महत्त्वाचे घटक मेन्थाल व पेपरमिंट ऑइल आहेत .
The post आहार : पाण्यात मिसळून प्या ‘पुदिना’, शरीरही राहिल दिवसभर हायड्रेट appeared first on Dainik Prabhat.