कोबी
कोबीमध्ये असणारे जीवनसत्त्व बी म्हणजे पोटात तसेच आतड्यात झालेल्या व्रणांवरील रामबाण उपाय आहे. कोबीची गणना पालेभाजीमध्ये करतात.
कोबीचे मूळ स्थान युरोप. आपल्याकडे आहारात त्याचा सर्रास उपयोग केला जातो.
गुणधर्म ः
कोबी मधुर, वृष्य, तिखट, कडवट, शीतल, पाचक, अग्निदीपक, हृदय आणि काही अंशी वातकारक आहे. तो कफ, पित्त, कोड, खोकला,
वगैरे विकारात उपयुक्त ठरतो.
घटक ः
पाणी90.2 टक्के
प्रोटीन1.8 टक्के
चरबी0.1 टक्के
कार्बोदित पदार्थ6.3 टक्के
खनिज पदार्थ0.6 टक्के
कॅल्शियम0.03 टक्के
फॉस्फरस0.05 टक्के
लोह100 ग्रॅम
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
जीवनसत्त्व बी100 ग्रॅम
नियासिन100 ग्रॅम
जीवनसत्त्व सी100 ग्रॅम
औषधी उपयोग :
कोबीमध्ये जीवनसत्त्व सी पुष्कळ प्रमाणात असते. रोज एक कप कच्च्या कोबीची कोशिंबीर खाल्ली असता, दैनंदिन आवश्यकतेच्या तिसऱ्या भागाइतके जीवनसत्त्व सी त्यातून मिळते. कोबीच्या बाहेरील हिरव्या पानांत ए जीवनसत्त्व व लोह भरपूर असते; आतील पांढऱ्या पानात ते नसते. कोबी जास्त शिजवू नये. जास्त शिजवला तर त्यातील ए आणि बी जीवनसत्त्व नष्ट होतात. कोबी वाफवण्यासाठी वापरलेले पाणी फेकून न देता त्याचा वाफारा घ्यावा किंवा प्यावे. कारण त्या पाण्यात जीवनसत्त्व सी तसेच कॅल्शियम, लोह, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. कोबी रसाचे अति सेवनही घातक ठरते. त्यामुळे थाइरॉइड ग्रंथींचा प्रमाणाबाहेर स्राव होण्याची शक्यता असते.
कोबी रसाच्या सेवनामुळे आतड्यातील व्रण नष्ट होतात. पांडुरोगामध्ये कोबीरस सेवनाने त्यातील लोह शरीरात त्वरित शोषला जात असल्याने उपयोगी ठरतो. रोज कोबी रस प्यायल्याने शरीराची वाढ चांगली होते नि प्रतिकारशक्तीही खूप वाढते. तसेच पोटदुखी थांबते आणि जठरावरील व्रणही नाहीसे होतात. पोटातील आग शांत करण्यासाठी, आंबट ढेकरा येत असतील तर, वारंवार उलट्या होत असतील तर, उलटीतून रक्त पडत असेल तर कोबी रस सेवन करावा. पचनक्रियांच्या तक्रारींसाठी कोबी रस उपयुक्त असतो. संधिवात, मेंदूतील ज्ञानतंतूंची दुर्बलता, दातांचे विकार, रक्तविकार, ज्ञानतंतूंचे विकार, अजीर्ण, पांडुरोग, डोळ्यांची दुर्बलता आणि स्थूलपणा या विकारांवर कोबी रस उपयुक्त असतो.
The post आहार : कोबी औषधी उपयोग appeared first on Dainik Prabhat.