Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : कॉफीचे किती प्रकार आहेत? कॉफीचे विविध प्रकार कसे बनवले जातात? जाणून घ्या रंजक माहिती

by
January 11, 2023
in आहार
A A
आहार : कॉफीचे किती प्रकार आहेत? कॉफीचे विविध प्रकार कसे बनवले जातात? जाणून घ्या रंजक माहिती
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अनेकांना कॉफी पिण्याची आवड असते. चहा किंवा कॉफीचे सेवन ही सवय आहे. लोकांना दिवसातून दोन ते तीन वेळा कॉफी पिण्याची सवय असते. अनेकदा लोक एनर्जी राखण्यासाठी कॉफीचे सेवन करतात. दिवसभर ऑफिसमध्ये काम करणारे लोक थकवा आणि एनर्जी वाढविण्यासाठी कॉफी पितात. कॉफीचे किती प्रकार आहेत हे अनेकांना माहीत नसते. अनेकदा जेव्हा लोक त्यांना विचारतात की त्यांना कोणत्या प्रकारची कॉफी प्यायची आहे, तेव्हा लोकांना समजत नाही. त्यांच्यासाठी कॉफी म्हणजे चहासारखे साधे पेय. अनेकवेळा तुम्ही कॅफेमध्ये गेलात आणि मेन्यूकार्डवर कॉफीचे विविध प्रकार पाहून तुम्हाला कोणती कॉफी ऑर्डर करायची असा गोंधळ होतो. कॉफीचे प्रकार किती आहेत, हे माहित असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडत्या चवीची कॉफी सहज ऑर्डर करू शकता.

* एस्प्रेसो
एस्प्रेसो अस्सल, गडद आणि स्ट्रॉंग कॉफी आहे. यामध्ये दुधाचा वापर केला जात नाही, तसेच साखरही टाकली जात नाही. याला ब्लॅक कॉफी देखील म्हटले जाऊ शकते, जी खूप स्ट्रॉंग असते.

* डॉप्पीओ

डॉप्पीओ (Doupio) ही डबल एस्प्रेसो आहे. डोप्पीओ एस्प्रेसोचे प्रमाण दुप्पट करते. अधिक स्ट्रॉंग कॉफी पिणारे डॉप्पीओ ऑर्डर करतात.

* अमेरिकन
एस्प्रेसो आणि गरम पाण्याच्या मिश्रणातून बनवलेली कॉफी म्हणजे अमेरिकन कॉफी. यामध्ये, एस्प्रेसो कॉफीमध्ये गरम पाणी मिसळले जाते, ज्यामुळे ते कमी स्ट्रॉंग होते. पण ब्लॅक कॉफीमध्येही त्याची गणना होते.

* कॅपेचीनो
या प्रकारच्या कॉफीमध्ये एस्प्रेसोमध्ये दूध आणि दुधाचा फेस वापरला जातो. वाफवलेले दूध कॉफीमध्ये मिसळले जाते आणि वर दुधाचा फेस तयार केला जातो. यात तिन्हींचे प्रमाण समान असते.

* लाटे
लाटे या कॉफीच्या प्रकारामध्ये एस्प्रेसो, स्किम्ड मिल्क आणि दुधाचा फेस यांचाही समावेश होतो. हे कॅपेचिनोसारखेच असते, परंतु या कॉफीमध्ये दुधाचे प्रमाण अधिक असते.

* मोका
कॉफीचा आणखी एक प्रकार म्हणजे मोका. लाटे कॉफीप्रमाणे मोका कॉफी मिल्क फॉर्म, स्किम्ड मिल्क आणि एस्प्रेसोने बनविली जाते, मात्र मोकामध्ये हॉट चॉकलेट देखील समाविष्ट असते. त्यामुळे त्याची चव अधिक मजेदार बनते.

* कोर्टाडो
कोर्टाडो कॉफी स्किम्ड मिल्क आणि एस्प्रेसोने बनवली जाते. यात दुधाचा फेस नसतो, फक्त गरम दुधात एस्प्रेसो मिसळले जाते.

* मॅकियाटो
या प्रकारच्या कॉफीमध्ये एस्प्रेसोबरोबर दुधाचा फेस मिसळला जातो. कोर्टाडो कॉफीसारखे त्यात गरम दूध समाविष्ट नसते, परंतु त्याऐवजी दुधाचा फेस वापरला जातो.

The post आहार : कॉफीचे किती प्रकार आहेत? कॉफीचे विविध प्रकार कसे बनवले जातात? जाणून घ्या रंजक माहिती appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar