Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहार : असा ठेवा तुमच्या बाळाचा पौष्टिक आहार, अन्यथा…

by
March 7, 2023
in आहार
A A
आहार : असा ठेवा तुमच्या बाळाचा पौष्टिक आहार, अन्यथा…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपण दिवसभरात मुलांना नेहमी दिले जाणारे पदार्थ आणि त्यांना पौष्टिक पर्यायी पदार्थ पाहूया.

अ) सकाळी उठल्यावर
सकाळी उठल्या उठल्या बहुतांश मुलांच्या पुढ्यात येतो (मुलांचा नावडता!) दुधाचा ग्लास. आजही दुधाला पूर्णान्न समजले जाते आणि मुलांनी सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास भरून दूध प्यायलाच हवे असा पालकांचा अट्टहास असतो. शिवाय दूध म्हणजे द्यायला सोपा आणि सोयीचा पर्याय! पण खरी परिस्थिती बघितली तर अनेक मुले दूध प्यायला सरळ नकार देतात, तोंडे वाकडी-तिकडी करतात किंवा दूध नाईलाजाने पोटात ढकलतात. मुलांनी दूध प्यावे म्हणून पालक त्यात सर्रास बोर्नव्हिटा, हॉर्लिक्‍स किंवा तत्सम पावडरी घालतात. जेणेकरून दुधाचा रंग आणि स्वाद बदलेल आणि मुले दूध पितील. पण या पावडरींचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येईल की त्यात 70 ते 80 टक्‍के फक्‍त साखर असते! त्यामुळे अशा पावडरींची चव मुलांना आवडते, त्याची सवय (व्यसन?) लागते आणि त्या पावडरी घातल्याशिवाय मुले दूध पीत नाहीत.

अनेक मुले दुधाबरोबर बिस्किटांचे पुडेच्या पुडे आरामात संपवतात! अनेकांचा दूध – बिस्किट सकाळचा नाश्‍ताच असतो. काही मुले तर चहादेखील पितात! (दुधात थोडासा चहा घालून पितात). या सगळ्यातून पोषण मिळणे दूरच पण सकाळच्या वेळीच घातक पदार्थांचा शरीरावर मारा सुरू होतो. या मुलांची वाढ चांगली कशी होणार? याला पर्याय काय? तर दुधात साखर किंवा या पावडरी न घालता खरोखरच दुधाची पौष्टिकता वाढवतील असे पदार्थ घालायला हवेत. दुधाबरोबर काही खायचे असेल तर त्यालाही पौष्टिक पर्याय शोधायला हवेत.

खिरी किंवा मिल्कशेक
सकाळी दुधाऐवजी वेगवेगळ्या खिरी देणे हा उत्तम पर्याय आहे. नाचणीची खीर, अळीवाची खीर, सातूची खीर, रव्याची खीर, राजगिऱ्याची खीर, लाल भोपळ्याची खीर असे कितीतरी पर्याय आहेत. खीर म्हटलं की त्यात भरपूर गूळ-साखर घालायलाच हवी अशी बऱ्याच पालकांची धारणा असते. पण साखर-गूळ न घालताही खीर चविष्ट होतात. प्रत्येक पदार्थाला त्याची

स्वतःची चव असते. ती मुलांना कळू द्या. दुधालाही स्वतःचा गोडवा असतो. अगदी गोडवा आणायचाच असल्यास खिरीत थोडा खजूर किंवा एखादा चिक्‍कू कुस्करून घालता येईल.
केळी, चिक्‍कू, सफरचंद, आंबा, खजूर यापैकी एका प्रकारचे फळ वापरून मिल्कशेक करणे हा देखील पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय आहे. फळात साखर असतेच. त्यामुळे मिल्कशेकमध्ये वरून साखर घालू नये.
खिरी किंवा मिल्कशेक घेऊन पोट छान भरते. वेगळे काही खायची गरज भासत नाही. तरीही खायचे असल्यास बिस्किटांना पर्याय म्हणजे सुकामेवा! रात्री भिजवून ठेवलेले बदाम, अक्रोड किंवा अगदी मूठभर शेंगदाणे देखील बिस्किटांपेक्षा कितीतरी पटींनी उत्तम!

लाल भोपळ्याची खीर
साहित्य : लाल भोपळा- अर्धा पाव, दूध – 1 कप, रात्रभर भिजवलेले बेदाणे- 7 ते 8, बदाम पूड – 1 चमचा, वेलची पूड – 1 चिमूट
कृती: सकाळी कुकर लावत असाल तर कुकरमध्ये लाल भोपळा सालासकट शिजवून घ्या. (आदल्या दिवशी रात्री शिजवून फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल) शिजलेला भोपळा आणि भिजवलेले बेदाणे एकत्र मिक्‍सरमधून काढा. दूध, बदामाची पूड, वेलची पूड घालून खायला द्या.

चॉकलेट मिल्कशेक
साहित्य : दूध – 1 ग्लास, खजूर – 3 ते 4, कोको पावडर (साखरविरहित) – 1 टीस्पून, मिल्क पावडर – 1 टीस्पून, व्हॅनिला इसेन्स – 2 ते 3 थेंब
कृती: खजुराच्या बिया काढून गरम दुधात खजूर थोडा वेळ भिजवावे. थंड झाल्यावर खजूर, कोको पावडर, आणि मिल्क पावडर थोडे दूध घालून मिक्‍सरमधून काढावे. शेवटी बाकीचे दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा फिरवावे.

ब) नाश्‍ता
काही घरांमध्ये नाश्‍ता ही पद्धतच नसते. तर बऱ्याच घरांमध्ये नाश्‍ता म्हणजे पोहे – उपमा – शिरा – साबुदाणा खिचडी इतकेच! या चारही पदार्थांमधून
कर्बोदके आणि उष्मांक सोडून विशेष काही मिळत नाही.

The post आहार : असा ठेवा तुमच्या बाळाचा पौष्टिक आहार, अन्यथा… appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar