मेथी : मेथीची भाजी सर्वांनाच आवडते. तिच्यातील कडू रसामुळे ती आरोग्यदायी आहे.
गुणधर्म :
मेथीची भाजी अरुची, उलटी, खोकला, वातरक्त, कफ, मूळव्याध, कृमी वगैरे विकारांत गुणकारी आहे. ती तिखट, कडू, उष्ण, पित्तवर्धक, क्षुधावर्धक, लघू, रुक्ष, जुलाबात गुणकारी, वायुनाशक आहे.
घटक ः
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
जीवनसत्त्व बी100 ग्रॅम
पाणी81.8 टक्के
प्रोटीन4.9 टक्के
चरबी0.9 टक्के
कार्बोदित पदार्थ9.8 टक्के
खनिज पदार्थ1.6 टक्के
कॅल्शियम0.47 टक्के
फॉस्फरस0.05 टक्के
लोह100 ग्रॅम
औषधी उपयोग
मेथीच्या कच्च्या भाजीचा रस उपयुक्त असतो. बाळंतपणात मेथीची भाजी, मेथीपूड घालून केलेले लाडू आवर्जून खावेत. ताप आला असताना मेथीचा रस घ्यावा. मेथी भूक वाढवते तसेच स्नायूंनाही बळकटी आणते. मेथीतील कडवटपणा कृमींचा नाश करतो. फेफरे येण्याची सवय असेल तर मेथीचा रस घ्यावा. मूळव्याधीमध्येही मेथी गुणकारी आहे. रक्तातिसारामध्ये मेथीच्या भाजीच्या रसामध्ये मनुका मिसळून ती खाल्ली असता चांगला गुण येतो. मेथीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने पांडुरोगामध्ये ही भाजी गुणकारी असते.
The post आहार : अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे मेथी, एक्सपर्टनी सांगितले जबरदस्त फायदे appeared first on Dainik Prabhat.