Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहारात ‘या’ भाज्यांचा रस महिनाभर रोज सेवन करा; आश्चर्यकारक फायदे मिळवा !

by प्रभात वृत्तसेवा
November 13, 2021
in आरोग्य वार्ता
A A
आहारात ‘या’ भाज्यांचा रस महिनाभर रोज सेवन करा; आश्चर्यकारक फायदे मिळवा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

करोना संसर्गाचा लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला होता, तर त्याच दरम्यान डेंग्यूच्या संसर्गाने समस्या आणखी वाढल्या आहेत. या दोन्ही रोगांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे – कमकुवत प्रतिकारशक्ती. आरोग्य तज्ञांच्या मते, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना करोना आणि डेंग्यू सारख्या इतर सर्व प्रकारच्या संसर्गाचा धोका असतो. 

डॉक्टरांच्या मते, आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण सहज प्रतिकारशक्ती मजबूत करू शकतो. काही विशिष्ट भाज्यांच्या रसाचे सेवन केल्याने अशा सर्व धोक्यांपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज भाज्यांचा रस सेवन करून तुम्ही स्वतःला ताजे आणि उत्साही ठेवू शकत नाही, तर अनेक प्रकारच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठीही ते खूप फायदेशीर मानले जाते. चला तर, जाणून घेऊया अशाच काही फायदेशीर भाज्यांच्या ज्यूसविषयी.

० भाज्यांच्या रसाचे फायदे काय आहेत?
आहारतज्ञांच्या मते, दररोज सर्व प्रकारच्या भाज्यांचे ज्यूस सेवन केल्यास शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे सहज पूर्ण होऊ शकतात. दुधी भोपळा, गाजर, बीट, कारले आणि पालक यांसारख्या भाज्यांच्या मिश्रित रसाचे सेवन केल्याने आतडे स्वच्छ राहते, ज्यामुळे पचनाची समस्या दूर होते. याशिवाय या सर्व भाज्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त मानल्या जातात.

० गाजर आणि बीट रस
आहारतज्ञांच्या मते, अशा अनेक भाज्या आणि फळे या हिवाळ्यात उपलब्ध आहेत, ज्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. बीटरूट आणि गाजराच्या रसाचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होण्यासोबतच रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यातील जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे हृदय, किडनी आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

० गाजर आणि बीटच्या रसाचे फायदे काय आहेत?
गाजर आणि बीट, दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन सी असते, तर गाजर हे जीवनसत्त्वे ए आणि सीचा चांगला स्रोत मानला जातो. त्यांच्या रसाचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते, तसेच त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून रोगप्रतिकारक पेशींचे संरक्षण करतात. हिवाळ्यात या प्रकारच्या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.

० ‘या’ भाज्यांचे रस देखील फायदेशीर
हेल्दी ज्यूससाठी दुधी भोपळा, पालक, आवळा, आले यांसारख्या भाज्यांचाही समावेश करू शकता. अद्रक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे, तर दुधी भोपळ्यामध्ये असलेले पोषक तत्व पोट आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. या रसाची चव वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार मीठ आणि मिरपूड देखील घालता येते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar