Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आर्थ्ररायटिसबद्दल गैरसमजच जास्त

by प्रभात वृत्तसेवा
October 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
आर्थ्ररायटिसबद्दल गैरसमजच जास्त
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आर्थ्ररायटिसबद्दल गैरसमजच जास्त

October 26th, 2:51pmOctober 26th, 2:51pm

प्रभात वृत्तसेवा

latest-news

सांधेदुखी किंवा हाडांना सूज येणे हा आजार बरेचदा वृद्धापकाळाशी निगडित असतो. आर्थ्ररायटिस हे जगभरामध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील दशलक्षांहून अधिक लोकांवर त्याचा परिणाम होत आहे. मधुमेह, एड्‌स आणि कॅन्सरसारख्या सर्वश्रुत आजारांच्या तुलनेत आर्थ्ररायटिसचा त्रास जडण्याची शक्‍यता खूप अधिक असते.

आर्थ्ररायटीसचे ऑस्टिओआर्थ्ररायटिस (ओए) आणि हुमॅटॉइड आर्थ्ररायटिस (आरए) असे दोन प्रकार आहेत. ओए आणि आरए या दोन्हींमध्ये सांधे आणि हाडे दुखतात. मात्र आरए ही एक ऑटोइम्युन स्थिती आहे (शरीर स्वत:वरच हल्ला करते) आणि ओए हा अगदी सर्रास आढळून येणारा प्रकार आहे, ज्यामध्ये तुमच्या सांध्यामध्ये असलेल्या हाडांच्या टोकांना आधार देणाऱ्या कूर्चेची हळूहळू झीज होत जाते. आर्थ्ररायइटिसबद्दलच्या काही अर्धसत्यांचे व भ्रामक समजूतींचे निराकरण करणे गरजेचे आहे. या समजूती पुढीलप्रमाणे:

आर्थ्ररायटिस केवळ म्हातारपणी होतो?
आर्थ्ररायटिस हा एक सर्रास आढळणारा आजार आहे, जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. तो प्रौढांवर अधिक परिणाम करतो हे खरे असले तरीही हुमॅटॉइड आर्थ्रसाइटिस (आरए)चा त्रास 20-25 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाही जडू शकतो.

आर्थ्ररायटिसचे दुखणे म्हणजे सांधेदुखी?
हाड तुटणे, जुनाट वेदना, बर्सायटिस आणि दुखापती अशा अनेक कारणांमुळे सांधे दुखू शकतात किंवा अवघडू शकतात. या इतर कारणांमुळे होणा-या वेदना आणि आर्थ्ररायटिस यांच्यामध्ये गल्लत करू नये आणि कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

आर्थ्ररायटिसवर कोणताच उपाय नाही?
आर्थ्ररायटिसवर उपाय शक्‍य आहे किंवा नाही याचे उत्तर प्रत्येक व्यक्‍तीगणिक आणि या आजाराशी संबंधित इतर कारणांनुसार वेगवेगळे येऊ शकते. निरोगी राहणे, तंबाखू सेवन टाळणे आणि वेळापत्रक सांभाळणे यामुळे आर्थ्ररायटिस लवकर बळावत नाही आणि स्थिती बिघडण्यास प्रतिबंध होऊ शकतो.

थंड आणि पावसाळी हवामानामुळे आर्थ्ररायटिस अधिकच गंभीर बनतो?
हवामान आणि आर्थ्ररायटिसचे बळावणे यांच्यामधीत संबंध सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. मात्र, कमी तापमानामुळे सांध्यामधील द्रवाच्या सांद्रतेवर परिणाम होतो व त्यामुळे सांधे ताठर भासू शकतात असे डॉक्‍टर सांगतात.

आर्थ्ररायटिसमुळे डोळ्यांवर परिणाम होतो?
आर्थ्ररायटिसमुळे होणाऱ्या सांधेदुखीचा डोळ्यांसह शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ शकतो. हुमाटॉइड आर्थ्ररायटिसमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. डोळ्यांना काही त्रास होत असल्याचे जाणवल्यास तत्काळ डोळ्यांच्या डॉक्‍टरांची भेट घ्या.

आजार आणि अवघडलेपणामुळे आपल्याला आपल्या शरीराविषयी अस्वस्थता जाणवते. अनेक स्त्रियांना याबाबतीत आर्थ्रायटिसमुळे आपला आत्मसन्मान जपता येत नाही. आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला मानणे आणि स्वत:ची काळजी घेणे या गोष्टींमुळे तुम्हाला आपल्या आजाराचे योग्य मूल्यमापन करता येईल व आर्थ्ररायटिसचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.

 

 

 

 

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar