Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्य वार्ता : हेडफोनमुळे येतेय बहिरेपणा

by
February 20, 2023
in आरोग्य वार्ता
A A
आरोग्य वार्ता : हेडफोनमुळे येतेय बहिरेपणा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आजची तरुणाई मोबाइल वेडी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मोबाइलवर बोलणे किंवा एमपी थ्रीवर गाणी ऐकणे यासाठी हॅन्ड्‌स फ्री किंवा हेडफोनचा वापर तर फारच मोठ्या प्रमाणात केला जातोय. हेडफोनच्या अतिवापरामुळे अमेरिकेसारख्या देशात तरुणाईला बहिरेपणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दीर्घकाळ अगदी जवळून मोठा आवाज किंवा ध्वनी कानावर आदळल्याने कानाच्या अंतर्गत भागात इजा होणे, बहिरेपणा येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते, असे संशोधकांनी केलेल्या संशोधनात उघड झाले आहे. अर्थात ही समस्या वार्ध्यक्‍यात जाणवते असे नव्हे तर अमेरिकेतील 18 ते 44 या वयोगटातील प्रत्येक चार जणांमध्ये एकाला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. न्यूयॉर्क शहरातील आरोग्य विभागाने 2018 मध्ये केलेल्या सर्व्हेमधील ही आकडेवारी आहे. हेडफोनचा कमी वापर किंवा हेडफोनचा वापरच न करणाऱ्यांच्या तुलनेत जे तरुण सातत्याने हेडफोन्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात ध्वनी ऐकतात त्यांना अधिक प्रमाणात कानांच्या समस्या भेडसावतात. हेडफोनचा वापर करण्यात अमेरिकेत 45 वयाच्या वरील लोकांपेक्षा 18 ते 44 या वयोगटांत लोकांची संख्या तिप्पट आहे.

समस्येवर उपाय
बहिरेपणाची ही समस्या टाळत्या येण्याजोगी आहे, मात्र अशा समस्याग्रस्तांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंताजनक आहे. आपले कान वाचवण्यासाठी हेडफोन वापरणाऱ्यांना अतिशय मोठ्याने आणि स्पष्ट संदेश म्हणजे त्यांनी त्यांच्या हेडफोनचा आवाज कमी ठेवणे योग्य राहील. सध्या न्यूयॉर्क शहरात 46 टक्के तरुणाई हेडफोनचा वापर दररोज करत असते. त्यातील 15 टक्के तरुण चार किंवा अधिक तास मोठ्या आवाजात ऐकणे पसंत करतात. अशांना लवकरच बहिरेपणा जाणवू लागतो. तो टाळण्यासाठी त्यांनी कमी आवाजात आणि कमीतकमी वेळा हेडफोनचा वापर करणे, त्याचप्रमाणे आपल्या टीव्ही, रेडिओ, म्युझिक सिस्टिमचा ध्वनी कमी असेल याची काळजी घेतली तर कानाची काळजी करण्याची आवश्‍यकता नाही.

कानाचे तीन भाग असतात. चेहऱ्याच्या बाजूला दिसतो तो बहिःकर्ण. म्हणजे आवाज साठवून आपल्या कानाच्या पडद्याकडे पाठवणारा भाग. हा पडदा पातळ पापुद्य्रासारखा असतो. तो ध्वनीलहरी झेलून आत पाठवतो. त्यामागे असतो तो मध्यकर्ण. त्यातली छोटी यंत्रणा या ध्वनीलहरी 22 पटीनं मोठ्या करून अंतकर्णाकडे पाठवते. तिथं असणाऱ्या छोट्याशा शंखासारख्या यंत्रणेतून ध्वनीलहरी कर्णनसेव्दारे मेंदूकडे जातात. तिथे त्याचे पृथक्करण होऊन माणसाला ध्वनीचे अचूक ज्ञान होते. याखेरीज काही ध्वनीलहरी कानाभोवतालच्या हाडातून मेंदूकडे पोहोचतात म्हणूनच बहिरेपणा आला तर ध्वनीचे नर्व्ह टेस्टिंग आणि बोन टेस्टिंग करावे लागते. अंतकर्णातल्या शंखात पाणी असते. ध्वनीवहनाखेरीज माणसाचा तोल जाऊ लागला वा वारंवार चक्‍कर येऊ लागली तर तज्ज्ञ डॉक्‍टर्स ही यंत्रणा तपासतात. यातलं पाणी जास्ती झाले अथवा त्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात गेले तर माणसाला घाम फुटतो, चक्‍कर येते आणि उलटी होते. याला मोशन सिकनेस म्हण्तात.

कानाच्या पडद्याला इजा पोहोचणं ही कानाची महत्त्चाची व्याधी. कानात जंतू शिरल्याने कान खाजू लागला की किंवा कानातला मळ काढण्यासाठी आपण कानात काडी किंवा पिन घालतो ते फार चुकीचे आहे. त्यामुळे पडद्याला भोक पडण्याची शक्‍यता असते. चाळिशीनंतर वेळ जात नसला की कानात बोटे घालणे, मळ ओरबाडून काढणे, पेन, पेन्सिली घालणे असले प्रकार अगदी सुशिक्षित लोकसुद्धा अगदी बोलता बोलता करता आणि मग बसतात कान धरून. त्याचप्रमाणे मोठ्याने टीव्ही लावणे, साउंड सिस्टीमच्या डान्सिंग पार्ट्या चाळिशीपूर्वी गोड वाटतात. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही बहिरेपण आल्याची उदाहरणे आहेत. मोठमोठ्या मल्टिफ्लेक्‍स थिअटरमध्ये वारंवार सिनेमाला जाण्यामुळे चाळिशीनंतर एकदम मोठ्यांदा बोलायला लागते कारण हळूहळू आवाजातील गोष्टी कान ग्रहण करेनासा होतो. ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम चाळिशीनंतर गंभीर स्वरूप धारण करते आणि अकाली बहिरेपणा येतो. हे प्रकार अत्यंत घातक आहेत. त्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती औषधे वापरावीत. वेळीच उपचार केले तर ही व्याधी पूर्ण बरी होते. अन्यथा, मध्यकर्णात पाणी होऊन पुढे त्यात पू होऊ शकतो. तो पू पडद्याला भोक पाडून ताबडतोब कानाबाहेर काढला नाही तर मेंदूपर्यंत पोहोचतो.

The post आरोग्य वार्ता : हेडफोनमुळे येतेय बहिरेपणा appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar