संधिवात हा विशेषत: महिलांचा शत्रू. पुरुषांपेक्षा महिलांमध्येच सांधेदुखी हा प्रकार जास्त करून असतो. सांधेदुखीतही अनेक प्रकार आहेत. गाऊट ही एक अतिशय वेदनामय स्थिती असते. शरीरातील लहान-मोठ्या सर्व सांध्यांवर याचा परिणाम होतो. गाऊटमध्ये आर्थरायटिसचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या शरीरात तयार होणारे युरिक ऍसिड असते. शरीरातील काही रासायनिक प्रक्रिया बिघडल्यामुळे सांधे आणि त्याच्याजवळ युरिक कण जमा होऊ लागतात. आपल्या शरीरात तयार होणाऱ्या युरिक ऍसिडपैकी 70 टक्के मूत्रमार्गाने विसर्जित होते आणि उरलेले पचन संस्थेमार्फत.
जेव्हा युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते तेव्हा ते सांधे, किडनी व मूत्रनलिकेत मूतखड्याच्या स्वरूपात जमा होऊ लागते. गाऊट दीर्घकाळ राहिल्यास युरिक कण त्वचेच्या खाली(कोपर आणि कानाच्या बाहेरील भागात) जमा होऊ लागतात. जर गाऊटवर उपचार केले नाहीत, तर युरिक कणांचा हा संग्रह ज्याला “टोळी’ म्हणतात, त्वचा फाडून बाहेर येऊन संक्रमणाची शिकार होऊ शकते. गाऊट असलेल्या व्यक्तींनी मांस, मासे, पाव, कोबी, मशरूम, डाळ इ. खाणे टाळावे किंवा त्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
ऑस्टो आर्थरायटिस :
यामध्ये सांध्यातील गाद्यांचे काम करणारी नरम हाडे झिजू लागतात, ते मोडतातही; त्यामुळे वेदना होतात आणि हाडे आखडतात. दुसऱ्या प्रकारचा आर्थरायटिस अनेक कारणांनी होऊ शकतो. एखादी जुनी जखम (किंवा हाडे मोडणे- फ्रॅक्चर), स्थूलपणामुळे सांध्यावर पडणाऱ्या वजनामुळेही हा रोग होऊ शकतो.
The post आरोग्य वार्ता : संधिवाताशी लढताना appeared first on Dainik Prabhat.