कुक्कुट म्हणजे कोंबडा. कुक्कुट हा शब्द संस्कृत आहे. या आसनामध्ये शरीराची अवस्था ही कोंबड्यासारखी होते म्हणूनच याला
कुक्कुटासन म्हणतात. दोन्ही हाताच्या आधाराने संपूर्ण शरीर उचलले जाते.
प्रथम पद्मासनात बसावे.
हाताची ध्यान मुद्रा ठेवावी.
ध्यान मुद्रा सोडून हात कंबरेजवळ टेकवावे.
डावा हात डाव्या पायाच्या मांडीतून जमिनीकडे न्यावा.
उजवा हात उजव्या पायाच्या मांडी आणि पोटरीतून कोपरापर्यंत बाहेर काढून जमिनीकडे न्यावा.
दोन्ही हाताची बोटे पसरवून जमिनीला टेकवावीत.
आता दोन्ही हाताच्या आधाराने शरीर उचलावे. फक्त दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर टेकलेले राहू द्यावेत. या स्थितीत श्वसन संथ ठेवावे.
पद्मासनात बसून गुडघे व मांडीतून हात घालून त्याच्या आधाराने पद्मासन उचलणे
आसन सोडताना सावकाश पद्मासन जमिनीवर टेकवावे.
उजवा हात उजव्या पोटरी व मांडीतून वर काढावा.
डावा हात डाव्या पोटरी आणि मांडीतून वर काढावा.
हाताची ध्यान मुद्रा करा.
कुक्कुटासनाचे फायदे
स्नायूंची कार्यक्षमता वाढते. कंबरेतील आणि पोटातील रक्ताभिसण सुधारते. पोटात जंत झालेल्यांनी हे आसन जरूर करावे. खांदे, कोपर, मनगट दणकट बनतात. मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना येणारे नैराश्य कमी होते. शारीरिक उत्साह तर वाढतोच पण मनही प्रसन्न रहाते. अती झोप येत असेल तर कुक्कुटासनामुळे कमी होते. शरीरातील 72 हजार नाड्यांची शुद्धी होते.
The post आरोग्य वार्ता : शारीरिक उत्साह वाढवते ‘कुक्कुटासन’ appeared first on Dainik Prabhat.
