ऍक्युपंक्चर हे पारंपरिक चिनी औषधांच्या तत्वांवर आधारित आहे आणि दोन हजार वर्षांहून अधिक काळ प्रचलीत आहे. टीसीएमच्या तत्वानुसार आपल्याला होणारे आजार आणि वेदना हे शरीरातून वाहणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहात खंड किंवा अडथळ्यामुळे होतात. मेरिडियनच्या बाजूने विशिष्ट बिंदूंमध्ये सुया घातल्याने ऊर्जेचा प्रवाह संतुलित करण्यास मदत करते. त्यामुळे आजार बरे होण्यास आणि वेदना कमी करण्यास प्रोत्साहन मिळते.
तीव्र वेदना डोकेदुखी पचन समस्या चिंता आणि नैराश्य यासह विविध परिस्थितीवर उपचार करण्यासाठी ऍक्युपंक्चरचा वापर केला जातो. ऍक्युपंक्चर हे अनुभवी डॉक्टर किंवा परवानाधारक आणि प्रशिक्षित प्रॅक्टिशनरद्वारे केले जाते; तेव्हाच ते सामान्यत: सुरक्षित मानले जाते. यासाठी वापरलेल्या सुया सामान्यतः खूप बारीक (0.25 एमएम) असतात ज्यामुळे वेदना किंवा अस्वस्थता येत नाही
ऍक्युपंक्चरची यंत्रणा अद्याप पाश्चात्य औषधांद्वारे पूर्णपणे समजली नसली तरी अभ्यासातून असे दिसून येते की, त्याचा शरीराच्या मज्जासंस्था, रोगप्रतिकारक प्रणाली आणि रक्तभिसरण प्रणालीवर चांगला परिणाम होतो आणि शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक एंडॉर्फिन निर्माण करण्यास मदतदेखील करते.
ऍक्युपंक्चरचे काही फायदे
वेदना कमी करणे:
वेदना कमी करण्यास किंवा वेदना कायमस्वरूपी थांबवण्यास ऍक्युपंक्चर मदत करते. विशेषतः मान, पाठ, गुडघा आणि तीव्र डोकेदुखी कमी करणे, यासाठी ऍक्युपंक्चरचा उपयोग होतो. ऍक्युपंक्चर शरीराच्या सिम्पथेटीक आणि पॅरासिम्पथेटीक संस्थेचे नियमन करून तणाव आणि चिंता कमी करते.
निद्रानाश :
ऍक्युपंक्चर झोपेची गुणवत्ता आणि कालावधी सुधारू शकते विशेषतः तीव्र निद्रानाश असलेल्यांना याचा खूप फायदा होतो.
शरीरात होणारी जळजळ
ऍक्युपंक्चर शरीरात होणारी जळजळ कमी करण्यास किंवा कायमस्वरूपी थांबवण्यास मदत करू शकते. त्यामुळे संधिवात आणि हाडांचे विकार यासारख्या परिस्थितीसाठी रुग्णाला ते फायदेशीर ठरू शकते.
पचन संस्था आणि त्यासंबंधातील विकार
ऍक्युपंक्चर पाचक रस आणि
हार्मोन्सच्या स्तरावरचे नियमन करून पचन सुधारण्यास मदत करते.
प्रजनन संस्थेसंबंधित विकार
प्रजनन अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारून आणि संप्रेरक पातळी नियंत्रित करून स्त्री आणि पुरुष दोघांचीही प्रजनन क्षमता सुधारण्यास ऍक्युपंक्चर मदत करते. त्यासंबंधीच्या आजारांना पूर्ण बरे करते.
हृदय आणि त्यासंबंधातील आजार
हृदयरोग, मानसिक रोग, रक्ताभिसरण संस्था, मध्ज्जा संस्था व रोगप्रतिकारक संस्था या सर्व घटकांवरील प्रभावीपणे उपचार केले ऍक्युपंक्चरद्वारे केले जाऊ शकतात. त्यामुळे ही थेरपी आज सर्वत्र लोकप्रिय झाली आहे.
The post आरोग्य वार्ता : लाभदायी ऍक्युपंक्चर appeared first on Dainik Prabhat.