हल्ली आपण बघतोय की नवीन पालकांमध्ये मुलांचा दातांबद्दल बऱ्याच शंका असतात. बऱ्याचदा लहान मुलांचे दात दुखतात व पालक घाबरून जातात. बऱ्याचदा दातांची रचना वेडी वाकडी असते. अशी बरीच कारण असतात जी पालकांसमोर बरेच प्रश्न उभे करतात.
किती महिन्यात दात यावेत?
माणसांमध्ये दातांचे दोन सेट असतात. दुधाचे दात आणि कायमस्वरूपी दात. साधारण सहाव्या महिन्यात दात यायला सुरवात होते. आधी समोरचे दात येतात व नंतर मागचे दात. वय 2.5 ते 3 वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात तोंडात येतात. दुधाचा दातांमध्ये जागा असणे नॉर्मल असते. मुलांचा तोंडामध्ये दुधाचे 20 दात असतात. सहाव्या वर्षांपासून कायमस्वरूपी दात यायला सुरवात होते..
बाळाला डेंटिस्ट कडे केव्हा न्यावे?
बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज की, त्रास झाल्याशिवाय डेंटिस्टकडे जायची गरज नसते. परंतु, त्रास होऊ नये म्हणून दर सहा महिन्यातून एकदा दात तपासून घ्यावेत. शक्यतो बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या जवळ बाळाला पहिल्यांदा डेंटिस्टकडे न्यावे. अशाने पालकांना लहान मुलांचा दातांची काळजी घेण्यासाठी काय करावे लागते हे समजते.
बाळांच्या दातांची काळजी कशी घ्यावी?
तोंडामध्ये दात आला की तो किडण्याची शक्यता 100% असते. पहिल्या दाताचे टोक तोंडात दिसले की, ते घासले जायला पाहिजे. मग बाळाचे वय कितीही असू देत. वयाच्या 3 ते 4 वर्षात काही मुलांचे दात किडल्यामुळे ते काढावे लागतात किंवा रूट कॅनॉलकरावे लागते. म्हणून गोड व चिकट पदार्थ बाळाला देऊ नयेत. रात्री दुधाची बाटली तोंडात ठेऊन मुलांना झोपवू नये. दररोज झोपण्यापूर्वी दात घासलेच पाहिजेत.
ज्या मुलांना थुंकायची समज नसते त्यांनी टूथपेस्ट वापरू नये. फक्त ब्रशने त्यांचे दात घासावेत. थुंकायची समाज अली ककी, दहा वर्षापर्यंत लहान मुलांच्या टूथपेस्टचा वापर करावा. 11व्या वर्षांपासून मोठ्यांची टूथपेस्ट कमी प्रमाणात वापरू शकता. दिवसातून 2 वेळा दात घासावेत. 4 मुलांचा दातांमध्ये काय ट्रेंटमेंट्स होऊ शकतात?
दातांमध्ये गॅप्स असल्यास…
मुलांची वाढ होत असताना जबड्यात खूप बदल होत असतात. दातांमध्ये जागा असणं किंवा रचना नीट नसणं स्वाभाविक आहे. बऱ्याचदा वयाचा 12 ते 13 व्य वर्षी सगळे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात आले की, दातांची रचना आपोआप व्यवस्थित होते. नाही झाली तर दातांना तारा लावून ते सरळ करून घ्यावेत. पुष्कळ वेळा दुधाचे सगळे दात पडायचा आधी दात वाकडे येऊ नयेत म्हणून काही उपचार करता येतात. म्हणून वर्षातून दोन वेळा डेंटिस्टकडे जाणे महत्त्वाचे असते.
The post आरोग्य वार्ता : लहान मुलांचे दंतोपचार appeared first on Dainik Prabhat.