यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील रासायनिक पातळी नियंत्रित करणे, तसेच पित्त नावाचा महत्त्वपूर्ण पाचक द्रव तयार करणे. याशिवाय रक्त स्वच्छ करण्याचे आणि ग्लायकोजेन नावाच्या साखरेच्या रूपात ऊर्जा साठवण्याचे कामही यकृताकडून केले जाते.
आता विचार करा तुमच्या शरीराचा असा अत्यावश्यक भाग खराब झाला तर? यकृत खराब होण्याच्या समस्येमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार सुरू केले तर यकृत खराब होण्यापासून वाचवता येते. चला जाणून घेऊया कोणत्या लक्षणांच्या आधारे त्याची ओळख होऊ शकते, तसेच ही गंभीर
समस्या टाळण्यासाठी काय उपाय असू शकतात?
यकृत निकामी होणे म्हणजे ते त्याचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही. ही आपत्कालीन स्थिती आहे, म्हणजेच रुग्णाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय असू शकतात का? या संदर्भात, तज्ज्ञ म्हणतात की काही लक्षणांच्या आधारे त्यांची ओळख करून, प्रतिबंधात्मक पद्धती वापरल्या जाऊ शकतात. यकृत खराब होण्याची शक्यता असलेल्या लोकांना रक्ताच्या उलट्या, थकवा, कावीळ आणि सतत वजन कमी होणे यासारख्या समस्या येतात. अशा समस्या
जाणवताच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सामान्यत: ज्यांना हिपॅटायटीस बी, लिव्हर सिरोसिससारखे आजार आहेत, त्यांना यकृत खराब होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय अल्कोहोल किंवा काही औषधांचे अतिसेवन केल्याने यकृत खराब होण्याची भीती असते. तज्ज्ञांच्या मते, यकृत खराब होण्याची समस्या विकसित होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. यकृत
कमकुवत झाल्याने प्रकृती गंभीर होते.
ज्या लोकांना यकृताचा आजार आहे किंवा यकृत खराब झाल्याची लक्षणे दिसत आहेत, त्यांना सर्वप्रथम डॉक्टर अल्कोहोल न घेण्याचा सल्ला देतात. याशिवाय अशा रुग्णांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा रुग्णांना लाल मांस, चीज आणि अंडी यांचे सेवन कमी करण्याबरोबरच अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
The post आरोग्य वार्ता : यकृत आरोग्यसाठी appeared first on Dainik Prabhat.