आधुनिक युगात घरोघर एक पाहुणा ठाण मांडून बसलेला आहे तो म्हणजे मधुमेह. भारत देश तर मधुमेह आजाराच्या बाबतीत आघाडीवर आहे. घरटी एकच काय आता दोनही व्यक्ती मधुमेहाने ग्रासलेल्या असतातच. हा आजार असा आहे की त्यामुळे रुग्ण कधीच आजारी दिसत नाही पण तो आतून हळूहळू पोखरला जात असतो. मधुमेह म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. रक्तातील शुगर प्रमाणाबाहेर गेली की मधुमेह व्याधी जडते.
वयाच्या चाळिसाव्या वर्षांपर्यंत अनेक टेन्शन्स घेतली जातात. शैक्षणिक, आर्थिक, संसारिक अशी टेन्शन्स त्याचबरोबर अतिप्रदूषण आणि कामाचा वाढता बोजा आदी घेतल्यामुळे अति काळजीने कित्येक व्यक्तींना मधुमेह जडतो. माणूस चाळिशीला टेकला नाही तोच त्याला शुगरचे दुखणे सुरू होते, पण मधुमेहाने गांगरून जाऊ नका. मधुमेह हा भारतासारख्या विकसनशील देशात खूप सामान्य रोग प्रकार झालेला आहे.
मधुमेहाचे वाईट परिणाम मेंदूवर, हृदयावर, यकृतावर हळूहळू होतच असतात. कामाचा ताण, वेळी अवेळी खाणे, बैठे काम, तेलकट तुपकट आणि गोडधोड खाण्यामुळे आणि कधी कधी आनुवांशिकतेमुळे शहरी जीवनात मधुमेह जवळपास रुटीनचाच भाग झालाय. परिणामी नित्यनेमाने कुठे ना कुठे या रोगावरील औषधनिर्मिती आणि प्रयोग सुरू असतातच. शरीरातील उदरपोकळीतील पॅन्क्रीयाज या ग्रंथीद्वारे शरीराला इन्शुलीनचा पुरवठा केला जातो. शरीरातील चयापचयाच्या क्रियेत इन्शुलीन स्रावाची महत्त्वाची भूमिका बजावते. अन्नावाटे येणारी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे विघटन करून त्यातील साखर वेगळी काढणे आणि तिचा शरीरातील वापर करणे ही शरीरातील महत्त्वाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत इन्शुलीन महत्त्वाची भूमिका बजावते. विविध स्नायूंमधील उती आणि मेंदू प्रमुख इंधन म्हणून वापर करत असल्याने साखरेचा पुरवठा सातत्याने होणे आवश्यक असते. अन्नपुरवठा न झाल्यास आतड्यांद्वारे साखर शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते अशावेळी शरीर यकृताने तयार केलेल्या साखरेचा साठा वापरते रक्तातील साखरेचे नियंत्रण करताना इन्शुलीन यकृताच्या साखर निर्मितीच्या कामावर नियंत्रण ठेवते.
पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये शरीरातील घटलेले इन्शुलीनचे प्रमाण वेगाने वाढवण्यासाठी मधुमेह नियंत्रणात आणणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन्सचा समावेश असतो. ही उपचार पद्धती प्रभावी असली तरी त्यात वारंवार साखरेचे प्रमाण तपासावे लागते, तसेच खाण्यापिण्याची बरीच पथ्ये सांभाळावी लागतात. मधुमेही लोकांसाठी शर्करानियंत्रणासाठी अनेक औषधे निघाली आहेत. खाण्याचा मोह टाळता आला आणि जिद्द, चिकाटी आणि संयम असला तर अवघडतील अवघड गोष्टही साध्य होते. तसाच हा मधुमेह. तुमचा मधुमेह बरा होणार आहे पण ही शर्करा कायम नॉर्मल रहावी म्हणून तुम्ही सप्तधान्याच्या पेजेला सोडू नये. त्यासाठी नेहमी 21 दिवसांनंतरही रोज पेजेचे प्रमाण फक्त एक वेळा करावे आणि एक वेळा रोजचे व्यवस्थित जेवण घ्यावे. मधुमेहींनी एक एक तासांनी खावे पण पेजेऐवजी सॅलेड, काकडी, टोमॅटो, सफरचंद (एकच). अशा पद्धतीने आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहाच्या कचाट्यातून कायमचे बाहेर पडता येईल.
The post आरोग्य वार्ता : मधुमेहाला घाबरू नका appeared first on Dainik Prabhat.