Sunday, January 25, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्य वार्ता : पिगमेंट व चेहऱ्यावरील वांग

by
October 31, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सौंदर्य टिकवून ठेवणं प्रत्येक स्त्रीला आवड आहे. स्त्री असो वा पुरुष विशेष करून नेहमीच चेहऱ्याची काळजी घेत असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. जाहिराती बघून आपण प्रॉडक्‍ट विकत घेतो. बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसते की, आपण जे सौंदर्यप्रसाधन विकत घेतो ते आपल्या चेहऱ्याच्या पोत नुसार योग्य आहे किंवा नाही. आजकाल मार्केटमध्ये शेकडो प्रॉडक्‍ट उपलब्ध आहेत पण आपल्या चेहऱ्याच्या पोत नुसार सूटेबल होईल असे योग्य प्रॉडक्‍ट विकत घ्यावे नाहीतर पिंपल, चेहऱ्यावर पडणारे डाग- वांगसारख्या समस्या चालू होतात.

भारतात 80 टक्के पेक्षा जास्त भारतीय लोकांना स्किन पिग्मिटेशन वांग च्या समस्या आहेत. प्रत्येकाची कारणे ही वेगवेगळी असू शकतात. बऱ्याच वेळा हार्मोन्स इनबॅलेन्स, बदललेली जीवनशैली, हवेतील प्रदूषण, अनियमित खानपान, सूर्याची किरणे यामुळेही आपल्या त्वचेची पोत बदलते. अतिउन्हाच्या संपर्कात आल्याने चेहऱ्यावर वांग येतात. यामुळे आत्मबल कमी होते व चार चौघात मिसळायला सेल्फ कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो.

वांग म्हणजे काय?
त्वचेत मेलानोसाईट्‌स नावाच्या रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशी असतात ज्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो जेव्हा मेलानोसाईट्‌स चे प्रमाण वाढते तेव्हा त्वचेतील काही भागात मेलॅनिन ची निर्मिती होऊन त्वचेचा काही ठराविक भाग काळपट दिसू लागतो. डाग पडतात यालाच वांग येणे म्हणतात.

वांगचे अनेक प्रकार असतात
सोलर लेंटिजिंस व एज स्पॉट्‌स
वाढत्या वयानुसार हार्मोन्स चेंजिंगमुळे चेहऱ्यावर एज स्पॉट येऊ लागतात. जास्त वेळ सूर्य किरणांच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांनाही ही समस्या निर्माण होते. ही समस्या शरीरावर चेहरा मान हात पाय उघड्या त्वचेवर होऊ शकते.

लक्षण आहे फिकट धूसर काळे डाग. मेलाज्मा यालाच क्‍लोज्मा ही म्हणतात. गर्भवती स्त्रियांना मेलाज्मा ची समस्या उद्भवू शकते.त्वचेवर गाल कपाळ हनुवटी नाक मान डार्क काळ्या रंगाचे डाग पडतात. ही समस्या गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळेही होते. कालांतराने हे डाग आपोआप मिटतात.

हायपर पिग्मेंटेशन
हायपर पिग्मेंटेशन मध्ये सोलर लेंटिजिंस व मेलाज्माचा ही समावेश असतो. हायपर पिग्मेंटेशन म्हणजे त्वचेवर पडणारे डार्क रंगाचे डाग, जे शरीरावर झालेली जखम, कापणे, भाजणे चट्टे, मुरुम यामुळे त्वचेवर निशाण किंवा व्रण तसेच राहून जातात. आजकाल ही समस्या सामान्य झाली आहे. त्वचेची नियमित काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच त्वचेची नियमित काळजी घेणे आवश्‍यक आहे.

The post आरोग्य वार्ता : पिगमेंट व चेहऱ्यावरील वांग appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar