आपल्या सर्वांना कधी ना कधी पचनाच्या समस्यांनी ग्रासले असेल, जसे की पोट खराब होणे, गॅस, छातीत जळजळ, मळमळ, बद्धकोष्ठता किंवा अतिसार. सामान्यत: काही साधे उपचार आणि घरगुती उपाय करून या समस्या दूर केल्या जाऊ शकतात; परंतु ही लक्षणे वारंवार दिसू लागली तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग, जुनाट डायरिया, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि अल्सर यासारख्या पाचन समस्या गंभीर समस्या असू शकतात, ज्यांचे वेळेवर निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे. पचनक्रिया उत्तम ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैली ही महत्त्वाची भूमिका मानली जाते.
आहारात फायबरचे प्रमाण वाढवा
फायबर समृध्द अन्नपदार्थांचे सेवन हे पाचक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक मानले जाते. विरघळणारे फायबर पाणी शोषून घेते आणि तुमच्या आतड्याची हालचाल सुलभ करण्यात मदत करते. आहाराद्वारे फायबर मिळवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ओट्स, बार्ली, संपूर्ण धान्य, नट आणि बिया फायबरने समृद्ध असतात. याशिवाय फळे आणि भाज्यांमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील अशा दोन्ही प्रकारच्या फायबर असतात, त्यांना आहाराचा भाग बनवायला हवा.
निरोगी चरबीदेखील आवश्यक
चांगल्या पचनासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात चरबीची आवश्यकता असू शकते. चरबी तुम्हाला जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते आणि जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के सारख्या पोषक तत्वांचे योग्य शोषण करण्यासाठी आवश्यक आहे. मात्र, यासाठी फक्त अशाच पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामध्ये हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतील. ओमेगा -3 फॅटी ऍसिड अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या आतड्यांसंबंधी रोग बरे करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे
कमी प्रमाणात पाणी पिणे हे बद्धकोष्ठतेच्या समस्येचे एक सामान्य कारण आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण सर्वांनी दररोज किमान 3-4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील अतिरिक्त सोडियम देखील काढून टाकते.
तणाव व्यवस्थापन महत्त्वाचे
तणावाचा तुमच्या पचनसंस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो? तणाव संप्रेरकांचा थेट परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो, ज्यामुळे अन्न पचनास त्रास होऊ शकतो. तुम्ही जास्त ताण घेतल्यास पोटात अल्सर, डायरिया, बद्धकोष्ठता आणि खइड सारखे आजार होण्याचा धोका असतो. तणावावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
The post आरोग्य वार्ता : पचनेंद्रियांच्या आरोग्यासाठी… appeared first on Dainik Prabhat.