अॅलर्जी अगदी छोट्या मुलांपासून शंभर वर्षाच्या लोकांपर्यंत कोणालाही होऊ शकते. अॅलर्जी ही एक सामान्य आरोग्याची एक प्रकारची स्थिती असते, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती कोणतेही परकीय पदार्थ किंवा अलर्जीन या घटकाला अतीप्रतिरोध करते, ज्याची अधिकतर लोकांमध्ये कसलीची प्रतिक्रिया होत नाही. अलर्जीची तीव्रता व्यक्तीपरत्त्वे वेगळी असते, पण कधी कधी लर्जी ही प्राणघातक वैद्यकीय उपचार पर्यंत होऊ शकते. बहुतेक अॅलर्जी बर्या होऊ शकत नाहीत, तथापी, अनेक लक्षणे शमवण्यासाठी बरेच उपचार उपचार ही करून घ्यावे लागतात. या लेखात या अॅलर्जीविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.
मानवी शरीराच्या त्वचेचे अनेक थर आहेत, त्वचा ही पूर्ण शरीराची संरक्षण करते असते. या त्वचेचे काही आजार विकारही आहेत. आजूबाजूला सध्या सगळ्यात जास्त आढळणारा प्रकार म्हणजे अॅलर्जी येणे. आपण ऐकत असतो कोणीतरी आपल्याला भेटतं किंवा आपण स्वतःही ते अनुभवत असतो आपल्या शरीरावरील त्वचेला कधीतरी कुठेतरी लालपणा येतो खाज सुटते बारीक पुटकुपुरळ्या उठतात. काही ठिकाणी चट्टे येतात काही ठिकाणी त्वचेची साल जातात. त्वचेवर खूप प्रमाणात काही ठिकाणी दाह जाणवतो. शरीरावरील काही ठिकाणच्या भागातच त्वचेचा रंग बदलतो. याचप्रमाणे केसांमध्ये खाज सुटते डोळे जळजळतात.
नाकातून पाणी गळतं, सर्दी होते घशाला खाज येते. त्याचबरोबर घशामध्ये अनेक फोड येतात. महिलांमध्ये मूत्रमार्गामध्ये काही समस्या उद्भवतात. याच सोबत त्वचेवरती काही ठिकाणी पांढर्या रंगाच्या अगदी बारीक ठराविक ठिकाणी पुंजक्या पुंजक्याने पुटकुळ्या येतात. अशा विविध प्रकारच्या एलर्जी आपण ऐकत असतो आणि क त्यातल्या काही आपण अनुभवत असतो. होणारी एलर्जी ही अचानक कधीही कुठेही कुणाच्याही शरीरावरील त्वचेवर अथवा अंतर्गत शरीरामध्ये उद्भवूू शकते. वातावरणातील बदलामुळे, धुळीची उन्हाची,खाद्यपदार्थांची, तिथल्या वातावरणाची सुद्धा अॅलर्जी माणसास होऊ शकते.
अॅलर्जी काय आहे
जगभरातील सर्व सामान्य आजारांपैकी अॅलर्जी एक आहे.स्किन अॅलर्जी खास करून तेव्हा होते जेव्हा आपली त्वचा कोणत्यातरी अशा गोष्टीच्या संपर्कात येते ज्यासाठी इम्युन सिस्टम त्याला रोखण्यासाठी अँटीबॉडीज रिलीज करते. अशावेळी आपल्या शरीरामध्ये लर्जीन नावाचा एक बॅक्टेरिया तयार होतो जो आपल्या शरीरातील सेल्समध्ये घुसून राहतो आणि शरीरात येणार्या बाहेरील घटकाला तीव्र विरोध करतो. परिणाम दिसून येतात अथवा शरीरामध्ये बदल घडलेले दिसतात यालाच अॅलर्जी असे म्हणतात. बहुतांश वेळी ही अॅलर्जी सामान्य असते तर काही वेळेस गंभीर असते. तर काही अॅलर्जी या जुन्या असतात ज्या औषधांमार्फत दूर केल्या जाऊ शकतात.
अलर्जीची लक्षणे सौम्य असू शकतात किंवा काही लोकांमध्ये ते जीवघेणीही असू शकतात. 20 व्या शतकाच्या सुरूवातीस अलर्जी एक दुर्लभ रोग मानला जात होता, पण अलीकडे अलर्जी वाढत गेलेली सर्वसामान्य लोकांमध्ये आढळून येणारी आहे. संशोधन दाखवतात की, जवळजवळ 20 टक्के लोक हे कायम अॅलर्जीच्या भयाखाली जीवन जगतात. जागतिक अलर्जी संघटनेच्या अहवालनुसार कोणत्याही देशाच्या लोकसंख्येच्या अंदाजे 10-40 टक्के लोक अॅलर्जी विकारांनी प्रभावित आहेत.व्यक्तीमध्ये, अॅलर्जी सामान्यतः त्यांच्या उमेदीच्या काळात प्रकट होत असते. त्यामुळे त्याच्यावरचे अनेक उपाय, त्यामुळे मानसिक खच्चीकरण, यामध्ये बराच कालावधी निघून जातो.
स्किन अॅलर्जी एक मोठी समस्या
स्किन अॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, सौंदर्य प्रसाधने, काही वेगळ्या प्रकारची कोल्ड्रिंक्स, अल्कोहोल, त्याचबरोबर सतत केसांमध्ये रंगाचा वापर, लिपस्टिक मध्ये सतत बदल करणे वेगवेगळे रंग वापरणे, बॉडी डिओड्रंट अथवा वेगवेगळे परफ्युम शरीरावर वापरणे, याचसोबत खाण्यामध्ये अजिनोमोटोचे प्रमाण वाढणे, सतत वेगवेगळ्या जीवनशैलीचा प्रभाव असण. कॉस्मेटिक ट्रीटमेंट करून घेणे, यामुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज, चट्टे, डाग अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहर्यावर डाग व्रण देखील सोडून जातात. स्किन अॅलर्जी ही फुड अॅलर्जीपेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अॅलर्जीमध्ये त्वचेला खूप आग आग होत राहते. वेळीच लक्ष न दिल्यास त्वचा अलर्जीचे रूपांतर भयानक प्रकारात होऊ शकते. त्यामुळे सगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर थोडं जपूनच करावा.
शरीराबाहेरील म्हणजेच त्वचेवरील अॅलर्जी व शरीरातील म्हणजे शरीरातील आतल्या चयापचायच्या क्रियेतून आतून असे दोन प्रकारे अॅलर्जी उद्भवूू शकतात. त्वचेवरील अॅलर्जी ही आधी सांगितल्याप्रमाणे त्वचेवरील वापरण्यात येणार्या अथवा लावल्या जाणार्या घटकांपासून होऊ शकते, तसेच शरीरातील अॅलर्जी ही वेगवेगळ्या अन्नपदार्थ, औषध, धूळ माती पाणी अथवा वातावरण बदलातून होऊ शकते.
अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची आणि आपल्या त्वचेची योग्य माहिती असणे गरजेचे असते. औषधांच्या मागे जाण्यापेक्षा आपल्याला कशामुळे त्रास होतो हे ओळखून ते करणे टाळणे तसेच घरगुती औषधांकडे लक्ष देणे कायम उपायकारक ठरते. त्यामुळे आपल्याला होणार्या अॅॅलर्जीचे सगळ्यात मोठे डॉक्टर आपण स्वतः असतो, कारण आपल्या शरीरातील आणि आपल्या त्वचेवरील बदल हे प्रथमतः आपल्याला जाणवत असतात आपण जर का योग्य त्या तज्ज्ञांकडे जाऊन त्याच्याबद्दल माहिती घेतली तर निश्चितच आपण सुरक्षित राहू शकतो.
महत्त्वाचे अॅलर्जीचे काही प्रकार
1. त्वचा अॅलर्जी… सौंदर्यप्रसाधनांमुळे
2.खाद्यपदार्थ अॅलर्जी.. वेगवेगळ्या खाद्यपदार्थातून अथवा तेलांमधून
3. वेगवेगळ्या प्राण्यांपासून त्यांच्या केसांपासून अॅलर्जी होऊ शकते.
4. काही औषधांपासून अॅलर्जी होऊ शकते.
5. काही पानांच्या वनस्पतींच्या वासामुळे अथवा स्पर्शामुळे तसेच फुलातील परागकणांमुळे सुद्धा अॅलर्जी येऊ शकते.
6. दुधातील लॅक्टिक अॅॅसिड या पदार्थामुळे सुद्धा काही जणांना दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी होऊ शकते.
====================
The post आरोग्य वार्ता : त्वचा अॅलर्जी, त्वचा विकार appeared first on Dainik Prabhat.