सोरायसिस अजार सामान्यतः 2 ते 3 टक्के जनसामान्यांमध्ये आढळतो सोरायसिस पीडित रुग्ण हे नेहमीच चट्टे यांवरील पडणाऱ्या भेगांचा त्रास व निराशआत्मक उपचारांचा त्रास सहन करत असतो काही रुग्णांना सोरायसिसमुळे होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते सध्याच्या काळात दूरदर्शन व इतर प्रचार माध्यमातून या आजाराचा प्रसार केल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे व आता त्वचेवर दुसराही आजार दिसल्यास तो सोरायसिस नाही का याची भीती ते बागळतात व मानसिक दडपणाखाली ते वावरतात.
सोरायसिस काय आहे?
सोरायसिस हा दीर्घकाळ राहणारा चर्मरोग आहे 50 ते 60 टक्के रुग्णात हा आजार विविध कारणांनी कमी जास्त होत असतो या आजारांमध्ये मुख्यता थोडी खाज लालसर व जाड कोंडा असणारे चट्टे निर्माण होतात हे चट्टे अंगावर कुठल्याहीभागावर येऊ शकतात प्रामुख्याने डोक्यामध्ये पाठीवर हातावरच्या कोपऱ्यावर व पायावरच्या जोडयांवर कोरड्या व थंड हवामानात याची तीव्रता वाढते.
लक्षणे-
अंगावर जाडसर पांढरे किंवा लाल चट्टे असणे.
जाड्या चट्ट्यांवर पांढरा कोंडा पडणे.
चट्ट्यांवर खाज असणे
प्रकार-
तळ पायावर व तळहातावर असणे
डोक्यामध्ये जाडसर कोंडा असणे व नाकाखाली कोंडा असणे
शरीरावर मुख्यतः जोडावर तीन ते चार चट्टे
पुर्ण शरीरावर चट्टे असणे पूर्ण शरीर लाल सर पडणे सूज येणे आणि
जाडसर कोंडा पडणे
मुख्यता हाताचे पायाचे पाठीचे इत्यादी जोड सांधे सुजणे आकाडणे व दुखणे.
तीव्रता वाढवणारे घटक
चट्ट्यांवर सतत खाजवणे
चट्ट्यांवर व त्वचेला घर्शन होणे
मानसिक तणाव व जास्त काळजी केल्याने
कोरडे व थंड हवामान
सिगारेट व मध्य प्राशन केल्याने
हा आजार कोणाला होतो-
जगातल्या जनसामान्यतील तीन टक्के लोकांना हा आजार होतो
हा आजार लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो.
The post आरोग्य वार्ता : जाणून घ्या…सोरायसिस काय आहे? appeared first on Dainik Prabhat.