नुकताच जागतिक भौतिक चिकित्सा दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला. न्यानिमित्त फिजिओथेरपी या विषयावर एक दृष्टीक्षेप
आजच्या काळात कामाचा ताण-तणाव आणि बदलती जीवनशैली पाहता वेगवेगळे आजार व व्याधी निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या औषधांचा वापर केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात. या औषधां-व्यतिरिक्त केली जाणासी उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपि . फिजिओथेरपिस्ट हे अस्थिव्यंग रुगणां च्या शरीराच्या ज्या भागात व्यंग आहे त्याचे परीक्षण करून त्या भागाला फिजिओथेरपी म्हणजेशास्त्रोक्त पद्धतीचे व्यायाम देतात.
अनेक सांध्यांच्या आजारांवर जसे फ्रॅक्चरनंतर येणारा कडकपणा, ऑपरेशन नंतरची गुंतागुंत, हिप रिप्लेसमेंट, गुडघ्याच्या वाट्यांचा बदल, फ्रोजन शोल्डर, मान, पाण आणि गुडघेदुखी, पक्षाघात इत्यादी दुखण्यांवर फिजिओथेरपी निश्चितच उपयुक्त आहे तसेच फिजिओथेरपिस्ट हे स्पोर्टस रिहॅब, जेरियाट्रीक रिहॅब तसेच माहिती-तंत्रज्ञानसह औद्योगिक कामगारांसाठी तंदुरुस्ती उपचार पण करतात. इलेक्ट्रोथेरपी आणि व्यायाम या दोन्हींचा सांगड घालून फिजियोथेरपी दिली जाते. या व्यायाम प्रकारांसाठी जिम बॉल, स्टॅबिलीटी ट्रेनर, थेरा बॅंड, ट्युब, टेप व हस्तोपचार पद्धती आणि ऑर्थोसिस यांचा वापर कला जातो.
एरोबिक एक्सरसाइजेस
ह्दयाची, फुफ्फुसांची आणि स्नायूंची गती आणि शक्ती वाढवण्याऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम म्हणतात. या व्यायामामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते. हे व्यायाम दररोज 20 ते 30 मिनिटे करणे.
अनाएरोबिक एक्सरसारजेस व्यायाम
या मध्ये स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायाम म्हणजेच वजनाचे व्यायाम, क्लोज चैन व्यायाम यांचा समावेश नसतो. वयोमानाने किंवा योग्य व्यायामांच्या अभावी स्नायू ताठरतात. त्यांची कार्यक्षमता कमी होते. फिजिओथेरपिस्ट ताकद आणि लवचिकता या दोन्हींची सांगड घालत प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र वेगळा असा व्यायामाचा कार्यक्रम बनवतात
इलेक्ट्रोमेट्री व्यायाम
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून स्नायूंना आराम व उत्तेजना मिळवण्यासाठी, दुखणे कमी करण्यासाठी, जखमा बऱ्या केल्या जातात. यात अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथर्मी, ट्रॅक्शन, इन्फ्रारेड, इन्फ्रारेड थेरपी, विविध क्युमेंट्स यांचा उपयोग केला जातो.
अल्ट्रासाऊंड, शॉर्टवेव्ह डायथर्मी, आयआरआर ही प्रामुख्याने शेक देण्याची उपकरणे आहेत. ट्रॅक्शन ही उपचार पध्दती मानेला अथवा कमरेला देण्यात येते
हस्तोपचार पद्धती
ड्राय नीडलींग, न्युरो ट्क्सक्निक, टेपिंग, कपिंग या अत्याधुनिक हस्तोपचार पद्धती आहेत.
ब्रेन-जिम व्यायाम
या व्यायामाचा उपयोग बुद्धी तल्लख करणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी होतो.
ब्रेन एक्सरसाईज हा मेंदूशी संबंधित अशी कोणतीही ऍक्टिविटी असू शकते ज्यामध्ये तुमचे मेंदू गुंतलेले असते यामध्ये कॉम्प्युटर गेम्स खेळण्यापासून ते वाचन आणि लोकांशी संवाद साधण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा समावेश असतो तुमच्या मेंदुचा व्यायाम करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक असते.
फिजिओथेरपिस्ट या सर्व उपचार पद्धतींचा वापर करून सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात या व्यायामामुळे मेंदूला चालना मिळते, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीरात रक्ताभिसरण वाढतं, पोटातील अवयव जसे जठर, आतडे मुत्रपिंड आदी विकार आणि निष्क्रियता होत नाही स्नायु, हाडे, सांधे यांचे आरोग्य, लवचिकता व ताकद उत्तम राहते
(लेखिका ऑर्थो-स्पोर्टस तज्ञ आहेत)
डॉ. पूजा लोणकर
The post आरोग्य वार्ता : गरज फिजिओथेरपीची appeared first on Dainik Prabhat.