Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्य वार्ता : ओमेगा-3 फॅटी ऍसिड

by
August 8, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार पाळणे आवश्‍यक मानले जाते, पण तुम्हाला तुमच्या आहारातून सर्व आवश्‍यक घटक मिळत आहेत का? हा प्रश्‍न उद्‌भवत आहे. जागतिक स्तरावर गेल्या काही वर्षांत व्हिटॅमिन सप्लिमेंट्‌सची मागणी झपाट्याने वाढली आहे. याचा अर्थ आहारात विशेष सुधारणा आवश्‍यक आहेत. शाकाहारी आहाराचे अनुसरण करणाऱ्या लोकांमध्ये ओमेगा-3 पोषक तत्वांची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो.

ओमेगा-3 फॅटी ऍसिड हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आवश्‍यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. सर्व लोकांनी आहारातून ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिड आवश्‍यक आहे.

शरीराला नैसर्गिकरित्या दीर्घ-साखळीतील ओमेगा-3 फॅटी ऍसिड अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) आवश्‍यक आहे, जे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मांसाहारातून ते सहज मिळू शकते. मात्र, तुम्ही शाकाहारी असाल तरीही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही ओमेगा-3 सहज मिळवू शकता.

अनेक पदार्थांमधून ओमेगा-3 फॅटी ऍसिड मिळू शकते. मासे, बिया आणि दाण्यांनी युक्त आहार तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्‍यक असलेले ओमेगा-3 मिळवण्यास मदत करू शकतो. ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे तुमच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी विविध फायदे आहेत.
ओमेगा-3 ची गरज अनेक वनस्पती-आधारित अन्नातून पूर्ण केली जाऊ शकते. दैनंदिन गरज पुरुषांसाठी 1,600 मिलीग्राम आणि महिलांसाठी 1,100 मिलीग्राम आहे.

चिया सिड्‌स आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्य लाभांनी परिपूर्ण आहेत. चिया सिड्‌समध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्‌ पचनास फायदेशीर असतात. त्यामध्ये फायबर आणि प्रथिनेही जास्त प्रमाणात असतात. रोजच्या आहारात चिया बियाणे बनवल्याने शरीरासाठी संबंधित आरोग्य फायदे मिळू शकतात.

एएलए ओमेगा-3 फॅटी ऍसिडसह अक्रोड हे निरोगी चरबीचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामध्ये प्रति कप 3.346 ग्रॅम एएलए असते. मेंदूशी संबंधित समस्यांचे धोके कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी अक्रोडाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. जे लोक रोज अक्रोड खातात त्यांना मेंदूशी संबंधित समस्यांचा धोका कमी असतो.

The post आरोग्य वार्ता : ओमेगा-3 फॅटी ऍसिड appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar