हे दंडस्थितीतील एक आसन आहे. या आसनात शरीराची अवस्था वीर हनुमानाप्रमाणे होते म्हणूनच याला महावीरासन म्हटले आहे. हे करायला अतिशय सोपे आहे.
प्रथम दंड स्थितीत उभे राहावे, भरपूर श्वास घ्यावा
श्वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा.
दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत न्यावेत, जणुकाही फार मोठे वजन उचलत आहोत अशी अवस्था हातांची करावी. हे आसन एकदा डावा पाय पुढे घेऊन करावे व एकदा उजवा पाय पुढे घेऊन करावे.
आसन सोडताना सावकाश श्वास सोडावा, हळूहळू पुढे घेतलेला पाय माघे घ्यावा. पाय पुढे मागे उजवीकडून आणि डावीकडृून जलद करावे.
महावीरासनाचे फायदे
या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हात पाय बळकट होतात. पोट साफ आणि हलके होते. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनते. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक बनतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आपली प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावे. स्त्रियांनीसुद्धा हे आसन नियमित करावे. यामुळे पोटाचे विकार बरे होते. मासिक पाळीतील आरोग्य सुधारते. हे आसन नियमित केले असता बुटक्या लोकांची उंची वाढण्यास मदत होते. हाता-पायातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन हाता-पायांची हाडे मजबूत होतात.
The post आरोग्य वार्ता : उंची वाढविण्यासाठी महावीरासन appeared first on Dainik Prabhat.