Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्य त्वचेचे – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 5, 2022
in आरोग्य वार्ता
A A
आरोग्य त्वचेचे – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कोणालाही भेटल्यानंतर प्रथम भेटीत लक्ष जाते ते त्याच्या त्वचेकडे, त्वचेचा टवटवितपणा, तजेलदारपणा आणि रंग नजरेत भरतात. नितळ त्वचा आणि चमकदार मुलायम केस हा तर आरसाच आहे शरीराचा. या दोन्ही गोष्टी व्यक्‍तिमत्त्वात भरच घालतात.

त्यासाठी सदैव त्वचा आणि केसांचं आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी, सौम्य व्यायाम व शांत स्वभाव यांची आवश्‍यकता असते. रोज नियमितपणे क्‍लीनिंग, टोनिंग व मॉइश्‍चरायझिंग (सीटीएन) करणे हे निरोगी तजेलदार त्वचेचे रहस्य आहे. क्‍लीनिंगमुळे मेकअप, प्रदूषण, धूळ इत्यादी त्वचेवरून काढून टाकण्यास मदत होते. टोनिंगमुळे त्वचेला नवीन चैतन्य प्राप्त होते आणि मॉइश्‍चरायझिंगमुळे त्वचेला ओलावा मिळतो.

त्वचेचे दोन प्रकार असतात : तेलकट आणि कोरडी. तेलकट त्वचेवर फोड, मुरूम येणे साहजिक असते. तेलकटच्या विरुद्ध कोरडी त्वचा असते. कोरडी त्वचा निस्तेज दिसते, तिला नैसर्गिक ओलावा नसतो.
त्वचेची काळजी घेताना रंगीबेरंगी साबणांना आकर्षित न होता त्वचा-प्रकारानुसार साबण/फेसवॉश निवडणे, सनस्क्रीनचा वापर करणे, नाइट क्रीम वापरणे अशा अनेक चांगल्या सवयी अंगी बाळगणे फायदेशीर ठरते. ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
ऋतुप्रमाणे वयोमानानुसार त्वचेत अनेक बदल होतात. उतारवयात त्वचेला सुरकुत्या येऊ नयेत, म्हणून नियमित फेशियल करणे, अँटीएजिंग क्रीमचा वापर करावा. तेलकट त्वचेच्या मानाने कोरडी त्वचा उतारवयात फार लवकर सुरकुतलेली दिसते. त्यामुळे आहार, रोजच्या सवयी इत्यादी गोष्टींमध्ये थोडा बदल करून त्वचेतील लवचिकपणा राखली जाऊ शकते.

तरुण वयात मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मुरूम-पुटकुळ्या येतात, त्यामुळे सौंदर्यात, व्यक्‍तिमत्त्वात बाधा येते. अशा वेळी पुढील उपाय करावेत :
चेहरा दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ व भरपूर पाण्याने धुवावा.
फास्ट फूड, जंक फूड, बेकरी पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नयेत.

गुलाबजल चेहऱ्याला टोन करून पोषण देते. रोज रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल घेऊन चेहऱ्याला लावून झोपावे.
एलोवेरा जेल चेहऱ्यावर आणि मानेवर लावून मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा.
मुरूम (पिंपल्स) फोडल्याने पू बाहेर येऊन चेहऱ्यावर अजून मुरूम येऊ शकतात, यामुळे मुरूम फोडू नयेत.
मुलतानी माती आठवड्यातून दोनदा लावल्यास मृत त्वचा निघून जाते.

नियमित स्क्रबिंग केल्याने मृत त्वचा निघून जाते.
तेलकट त्वचेसाठी सौम्य क्‍लिनिंग क्रीम आणि स्क्रब वापरणे योग्य. घरच्या घरी हळदीचे किंवा चण्याचे पीठ आणि दूध किंवा गुलाब जल असा पॅक तयार करून वापरल्यास त्वचा चमकदार होते.
कोरड्या त्वचेसाठी मॉइश्‍चरायझर वापरावे आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
तैलीय भागासाठी क्‍लिन्झर आणि नियमित स्क्रबर वापरावे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar