सत्तर वर्षांच्या शैला दवे यांना त्यांच्या दोन्ही गुडघ्यात आणि डाव्या पायात त्यांना खूप त्रास होत होता. त्यांचे वजनही नाही म्हटले तरी थोडं जास्तच होतं. दोन्ही पायांमध्ये ऑस्टिओ-आर्थरायटीस होतं. म्हणून या वयस्कर महिलेला बिनामदतीचे चालणे अशक्य झाले होते. त्यांना अगदी थोडेच चालायचं असेल तरी वॉकिंग स्टिकची मदत घ्यावी लागायची. नी-कॅप, पेनकिलर्स आणि कितीतरी फिजियोथेरेपी व्यायामासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा, मदत आणि इलाज केल्यानंतर शैला दवे या वैकल्पिक उपचारासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या, कारण त्यांना नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची त्यांची इच्छा नव्हती.
दवे यांच्या या स्थितीकडे बघता, आणि त्यांच्या चिंतेचा विचार करता डॉक्टरांनी त्यांना पीआरपी (प्लानेट रिच प्लाज्मा) इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. सहा महिन्यांपर्यंत इंजेक्शन घेतल्यानंतर दवे यांना बराचसा आराम मिळाला. त्रास ही खूप कमी झाला होता. त्यांना एवढा आराम मिळायला लागला की, त्या वॉकिंग-एडशिवाय किंवा कुणाचीही मदत न घेता चालायला लागल्या. त्यांचे वेदनाशामक गोळ्यावर अवलंबून असणे आणि त्या गोळ्यांवरचा असलेला विश्वास हळूहळू कमी व्हायला लागला.
काय आहे पीआरपी थेरेपी?
पीआरपी ही एक आधुनिक थेरेपी आहे. ज्याला प्लै प्लेटलेट्स-रिच प्लाज्मा थेरेपी या नावानेही ओळखले जाते. या थेरेपीत ज्या व्यक्तीचा उपचार केला जातोय, त्याच व्यक्तीचे रक्त घेतलं जातं! या रक्ताचं अपकेन्द्रन केलं जात, कारण प्लेटलेट्सच्या सोबत प्लाज्माट्यूबमध्ये ते एकत्र करता येईल. या प्लाज्मामध्ये प्लेटलेट्स आणि विकसित पेशी असलेल्या ग्रोथ फॅक्टर्सचे प्रमाण जास्त असते. उतकांचे पुनर्निर्माण (टिश्यू रिजनरेशन) आणि ऱ्हास झालेल्या उतकांना (टिश्यू कल्चर) बरे करण्यात खूप उपयोगाला येते.
पीआरपीमधे सामान्य रक्ताच्या तुलनेत पाच पट अधिक प्लाज्मा असते. याशिवाय यात प्लेटलेट्स आणि ग्रोथ फॅक्टरही जास्त प्रमाणात असतो. या थेरेपीचा मूळ स्रोत हा आहे की, प्लेटलेट्स शरीराला झालेला घाव भरण्यास खूप मदत करतात. एका वेळेस 20 मिली लिटर रक्त घेतलं जातं. यातल्या प्लेटलेट्स वेगवेगळ्या केल्या जातात. नंतर यात एक ऍक्टिव्हेटर मिसळलं जातं, जे प्लेटलेट्सला ऍक्टिवेट करतं, कारण कर जिथे पेशींचा ऱ्हास झाला आहे, तिथे हे चांगले कार्य करू शकेल.
कसे कार्य करते..?
सर्वांत अगोदर प्रभावित भागाला बधिर करण्यासाठी सामान्य ऍनास्थेशिया (जनरल भूल) दिला जातो. नंतर विशेष मायक्रो-निडलच्या साहाय्याने पीआरपी गुडघ्यात टोचली जाते. त्यामुळे रक्त प्रवाह अधिकच सक्रिय होतो. याच्या स्टेम सेल्स उतकांची दुरुस्ती (टिश्यू रिपेअरिंग) करतात. त्याचबरोबर सूजही कमी करतात आणि या प्रकारे ऑस्टियो आर्थरायटीसची सर्वच लक्षणं कमी करतात. या संपूर्ण प्रक्रियेला फक्त दोन ते तीन तास पुरेसे असतात. यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचीही गरज नाही.
पीआरपी उपचारामुळे स्नायूंचा त्रास, शरीर आखडणे आणि रोजच्या कार्य शैलीत खूप फरक पडतो. पीआरपी हे काही सिंथेटिक नाहीये, तर एक प्रकारचे जैविक इंजेक्शन आहे, म्हणून याचा रुग्णांवर प्रभाव वेगवेगळा होतो. वेगवेगळा अभ्यास असे सांगतो की, जवळ जवळ 80 टक्के प्रकरणात खूप सारे क्लिनिकल आणि फंक्शनल फायदे बघितले गेले आहेत. एक वर्षापर्यंत आर्थरायटीसची तक्रार रुग्ण करत नाही.
किती कार्य करते पीआरपी थेरेपी?
पीआरपी इंजेक्शनसोबत एक गोष्ट नक्कीच घडते की, याचे परिणाम हळूहळू पुढे सरकतात आणि चार ते सहा आठवड्यानंतर याचा अधिक चांगला परिणाम तुम्हाला दिसायला लागतो. म्हणून रुग्णाला हे आधीच सांगायला हवे आहे की, या इंजेक्शनच्या ताबडतोब परिणामांची अपेक्षा केली जाऊ नये. आर्थिकदृष्ट्याही हे इंजेक्शन खूप परवडणारे आहे. गुडघा बदलाच्या शस्त्रक्रियेला (नि रिप्लेसमेंट सर्जरी) जितका खर्च येतो, त्याच्या अवघ्या दहा टक्के खर्चात हा उपचार केला जातो. तसेच हा उपचार कोणत्याही वयाच्या रुग्णासाठी लाभदायी आहे. कारण याचा काहीही दुष्परिणाम अर्थात साईड इफेक्ट होत नाही. तसे बघता, पीआरपी इंजेक्शन घेण्यासाठी वयाची मर्यादा वगैरे प्रकारची सावधानी बाळगायची गरज नाही. पण आर्थरायटीसच्या सुरुवातीच्या होणाऱ्या त्रासापासूनच जितक्या लवकर हा उपाय केला जाईल तितके चांगले आहे. कारण जास्तीत जास्त काळापर्यंत याचा फायदा आपल्याला मिळू शकेल.