Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्य जागर – गर्भावस्था आणि व्यायाम – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
January 12, 2022
in आरोग्य वार्ता
A A
आरोग्य जागर – गर्भावस्था आणि व्यायाम – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram
chitale-mob

जेव्हा एखादी महिला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना समजते, तेव्हा तिने काय खावे, काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत, किती वेळ काम करावे, कितीवेळ आराम करावा, कसे उठावे, कसे बसावे, या आणि अशा अनेक बाबतीत सल्ल्यांचा भडिमारच जणू तिच्यावर होत असतो. सर्वजण आपापल्या परीने त्या महिलेला चांगलेच सल्ले देत असले, तरी यातील कोणते सल्ले स्वीकारावेत आणि कोणते नाही, याबद्दल विचार करून मात्र त्या महिलेच्या मनामध्ये चांगलाच गोंधळ उडत असतो. गर्भावस्थेमध्ये महिला जितकी सक्रिय राहील, तितके तिचे बाळंतपण सोपे होत असते, हा सल्लादेखील गर्भवती महिलेला नेहमीच दिला जात असतो.

पूर्वीच्या काळी महिला घरातील कामे करत असतानाच त्यांना भरपूर शारीरिक व्यायाम आपोआपच मिळत असे. आता काळ बदलला तसे घरातील अधिकतर कामे करण्यासाठी मशिन्सचा वापर केला जाऊ लागला. लोकांचे राहणीमान सुधारल्याने घरातील कामांसाठी कामवाल्या मावशींची मदतही सहज उपलब्ध झाली. त्यामुळे गर्भावस्थेत सक्रिय राहण्यासाठी व्यायाम आवश्‍यक आहेच, पण त्यासोबत कोणत्या प्रकारचे व्यायाम केले जावेत जेणेकरून महिलेला आणि तिच्या बाळाला यापासून कोणत्याही प्रकारचा धोका उद्‌भवणार नाही, याचा विचार केला जाणे हे महत्त्वाचे आहे.

आपण आई होणार असल्याची बातमी ही एखाद्या महिलेच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीतही मोठा बदल घडविणारी असते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या बारा आठवड्यांच्या काळामध्ये शरीरामध्ये अनेक हार्मोन्समध्ये बदल घडून येत असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये सतत थकवा, होणाऱ्या बाळाविषयी, प्रसूतीविषयीची चिंता महिलेला सतावू शकते. त्यानंतरच्या दिवसांमध्ये मात्र हार्मोन्सच्या पातळी स्थिरस्थावर झाल्याने ही सर्व लक्षणे नाहीशी होऊन, गर्भार महिलेच्या चेहऱ्यावर आगळेच तेज दिसू लागतो. या दिवसांत मनामध्ये अतिशय उत्साह आणि आनंद भरलेला असतो. या दिवसांमध्ये आरोग्य उत्तम राखण्यासाठी एरव्ही आवर्जून केला जाणारा व्यायाम थोडास मागे पडू शकतो, तेव्हा व्यायाम करायलाच पाहिजे असा अट्टहास न करता, आपल्याला मानवेल आणि झेपेल तेवढाच व्यायाम घेणे श्रेयस्कर ठरते. व्यायामाच्या बाबतीत, गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये काळजी घेतले जाणे अतिशय आवश्‍यक असते. या दिवसांमध्ये अवाजवी श्रम घडविणारे व्यायाम टाळून हलके व्यायाम घेणे चांगले. यामध्ये चालण्याचा व्यायाम सर्वात उत्तम समजला जातो.

गर्भावस्थेचे तीन महिने पार पडले, की त्यानंतर आपल्याला झेपेल तेवढे चालण्याचे अंतर आणि गती कमी-जास्त करावी. या दिवसांमध्ये पोटाचा आकार वाढण्यास सुरुवात होत असल्याने महिलेच्या शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, संतुलन या सर्वच गोष्टींमध्ये बदल होत असतो. हे बदल ध्यानी घेऊनच व्यायामाचा विचार केले जाणे आवश्‍यक आहे. या दिवसांमध्ये सायकल चालविणे, पळणे यांसारखे व्यायाम शक्‍यतो टाळावेत.

तसेच फार जड वस्तू उचलणे, सतत जिन्यांची चढ-उतार इत्यादी ही टाळायला हवे. गर्भावस्थेमध्ये कोणताही नवा व्यायामप्रकार सुरू करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या शरीराच्या सवयीचा आणि सहज झेपेल अशाच व्यायामप्रकारची निवड केली जाणे आवश्‍यक आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar