भारतातील प्रत्येक व्यक्तीला आवळा हे फळ माहीत आहे, पण आवळ्याचा योग्य उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी कसा करावा हे प्रत्येकालाच माहीत असतेच असे नाही. मग आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्याला माहीत आहे का डोक्याच्या घनदाट काळेशार केसांपासून तर सुंदर तेजस्वी टवटवीत चमकणाऱ्या त्वचेसाठी आपल्याला “विटामिन सी’ ची आवश्यकता असते.
आवळ्यात विटामिन सी चे प्रमाण भरभरून असते. तसेच विटामिन ए , बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम कार्बोहायड्रेट आयर्न आणि फायबरयुक्त गुण असतात. हे शरीराच्या अनेक समस्यांचे निवारण करतात. अनेक औषधी मात्रांनी संपन्न आवळ्याला आपण कच्चा पण खाऊ शकतो, आवळ्याचे ज्युस बनवून पिऊ शकतो, मुरब्बा आवळा कंठी अनेक प्रकारे आवळ्याचे सेवन करू शकतो. आवळ्याला संस्कृतमध्ये अमृत फल असे म्हटले जाते. आवळ्याची पानं, फुलं, बिया, साल सर्वांमध्ये औषधीय गुण आहेत. भारताऐवजी मलेशिया चीनमध्येसुद्धा आवळ्याचे भौगोलिक वर्णन आढळून येते.
आवळा खाण्याचे फायदे :
आवळा इम्युनिटी पॉवर वाढवतो.
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.
केसांची पोत सुधारण्यास मदत करतो.
पोटासंबंधी आजार दूर करतो.
आवळ्यात विटामिन सी सोबत अँटी ऑक्सिडेंट जास्त प्रमाणात असते जो केसांचे नैसर्गिक रंग टिकवून ठेवतो.
केसांना अवकाळी लवकर सफेद होण्यापासून वाचवतो.
आवळा खाल्ल्याने रक्त शुद्ध होते
लिव्हरचे आजार बरे करण्यासाठी मदत होते.
मोटापा कमी करण्यासाठी उपयुक्त.
आवळा खाल्ल्याने दात मजबूत होतात.
आवळा बुद्धिवर्धक असतो.
बुद्धिजीवी व्यक्ती आवळापासून बनवलेले च्यवनप्राश आवळा कंठी आवळ्याचा मुरब्बा सारखे पेय बुद्धी तल्लख करण्यासाठी उपयोगात आणतात.
आवळा खाणे जितके फायदेमंद आहे तितकेच आवळा अति जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसानही आढळते.
आवळ्याच्या अतिसेवनाचे नुकसान :
गर्भवती स्त्रियांनी आवळा कमी प्रमाणात खावे कारण पाचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
लो ब्लड शुगरमध्ये जे व्यक्ती डायबिटीसची औषधी घेत असतील त्यांनी आवळ्याचे सेवन कमी करावे.
आवळ्याच्या अतिसेवनाने शरीरात सोडियमची लेव्हल वाढते आणि यामुळे किडनीची समस्या उद्भवू शकते. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.
ज्या व्यक्तींना ब्लड डिसऑर्डरचा त्रास आहे त्यांनी आवळा कमी प्रमाणात खावे.
आवळा खाल्ल्यानंतर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी दुधापासून बनवलेले पेय जसे चहा कॉफी वगैरे पिऊ नये. असे केल्यास हानिकारक ठरू शकते.
आवळा ड्राय असतो म्हणून खाल्ल्यावर भरपूर पाणी प्यावे.
The post आरोग्याचा खजिना आहे आवळा, जाणून घ्या सेवन करण्याचे ‘फायदे appeared first on Dainik Prabhat.