Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्यवर्धक गाजर …! जाऊन घ्या महत्वाचे फायदे…

by
April 2, 2023
in आहार
A A
आरोग्यवर्धक गाजर …! जाऊन घ्या महत्वाचे फायदे…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अति थंड खाल्ल्यामुळे तसेच सिगारेट, दारू अतिप्यायल्यामुळे गरम पदार्थांचे खूप सेवन केल्यामुळे घसा खराब होतो. काही वेळा तुमानानुसार कच्ची फळे खाऊन घशाला इनफेक्‍शन होते. खूप जोरात बोलल्यामुळे सुद्धा घशाला सूज येते. अशावेळी खालील उपचार करावेत.

गाजराच्या रसात आल्याचा रस मिसळावा आणि प्यावा
धन्याच्या चूर्णात गुलाबपाणी मिसळून ती पेस्ट गळ्याला लावावी.
हळद आणि गूळ एकत्र कुटून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात. दोन गोळ्या खाल्ल्यानंतर गाजराचा रस प्यावा
गाजराचे थोडे तुकडे घ्यावेत. त्याच्यावर थोडी काळी मिरीची पावडर थोडी भुरभुरावी आणि खावी.
अशाप्रकारे खवखवणाऱ्या घशावर गाजर प्रभावी आहे. तसेच गाजरामुळे घशाच्या आतील सूज कमी होते.

नपुसंकतेवर गाजराचा उपचार
खूप स्त्री सहवासामुळे किंवा अंडकोशात जखम झाल्यामुळे किंवा शरीरात अती चरबी झाल्यामुळे तसेच मंदाग्नीमुळे आणि खूप दारू प्यायल्यामुळे अथवा मादक द्रव्यांचे सेवन केल्यामुळे नपुसकता येते. असे पुरुष स्त्रीला शारीरिक संबंधाचे समाधान देऊ शकत नाही. या रोगांवर गाजर अतिशय उपयुक्‍त आहे.
गाजराचा मुरंबा रोज सकाळ-संध्याकाळ गाईच्या दुधाबरोबर खावा. अशा व्यक्‍तींनी मिरची तसेच तेलकट, मसालेदार पदार्थ कमी खावेत. याउलट रोज एक गाजर खावे.
गाजराची कोशिंबीर, गाजर हलवा अथवा ताकात गाजर किसून ते किंचित मीठ घालून वेलदोड्यांचे दाणे घालून सकाळ-संध्याकाळ खावे.

जुलाबावर गाजराचा उपचार
अचानक तुमान बदलल्यावर अथवा फ्रिजमधील थंड पण खूप शिळे दूध प्यायले असता जुलाब होऊ लागतात.
या जुलाबावर खालील उपचार करावा.
गाजराच्या रसात जायफळ व सुंठ उगाळून ते चाटण चाटावे.
जांभळाची बी गाजराच्या रसात उगाळावी आणि हे चाटण चाटावे.
अर्धा चमचा आल्याचा रस पाव चमचा तुळशीचा रस आणि एक चमचा गाजराचा रस असे मिश्रण बनवून ते दिवसातून तीनदा घ्यावे.
गाजराच्या रसात जायफळ उगाळून घट्टसर चाटण बनवावे आणि ते चाटण चाटावे.
एक चमचा गाजराच्या रसात अर्धा चमचा तुळशीचा रस मिसळून ते मिश्रण प्यावे.

स्वप्नदोषांवर गाजराचा उपचार
मानसिक कमजोरीमुळे काही वेळा स्वप्नदोषांचा आजार जडतो. अशावेळी खालील उपचार करावा
दोन पाकळ्या लसूण चुरडून गाजराच्या रसात टाकून तो रस प्यावा
15 ग्रॅम आवळ्याचा मुरंबा रोज खावा आणि वरून गाजराचा रस प्यावा.
शतावरी 100 ग्रॅम, गोखरू 50 ग्रॅम, केशर 1 चिमूटभर, अर्धा चमचा जायफळाचे चूर्ण हे सर्व एकत्र करून एक चमचा खावे वरून गाजराचा रस प्यावा.
बेलफळाचा गर 10 ग्रॅम, भांग 1 ग्रॅम, धने 10 ग्रॅम, बडीशेप 5 ग्रॅम सर्व 100 ग्रॅम गाजराच्या रसात रात्री भिजवा. सकाळी चांगले घोटा.

सुंदर तजेलदार चेहऱ्यासाठी गाजर
गाजरे खाऊन आपण सुंदर दिसू शकतो. असे म्हटले तर आश्‍चर्य वाटेल पण हे खरे आहे. कारण गाजारात कॅरोटीन, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन डी, नियासिन फॉलिक ऍसिड, बायोरिन आणि बी कॉम्पेलक्‍स असे अनेक घटक आहेत.
गाजराला इंग्रजीत कॅरट म्हणतात. त्यावरूनच कॅरोटीन हा शब्द आला आहे. गाजरात असलेले कॅल्शियम सहज पचण्याजोगे आहे. फक्‍त गाजरे खाऊन साऱ्या शरीराला लागणारे कॅल्शियम आपण मिळवू शकतो. गाजराचा रस प्यायल्यामुळे हा फायदा होतो.
गाजराचा हलवा अगर बर्फी करून खाण्यापेक्षा ती चावून चावून खावीत. त्यामुळे दात, हिरड्या मजबूत होताततच, पण त्याबरोबर नैसर्गिक रस पोटात जातो.
गाजरात व्हिटॅमीन अ भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे डोळे निकोप व सतेज राहतात. त्यासाठी रोज गाजराचा रस प्यावा.
गाजराच्या रसात टॉकोकिनन नावाचा घटक आहे. तो मानवाच्या शरीरात तयार होत असणाऱ्या इन्शुलिनप्रमाणे असतो आणि मधुमेहांमध्ये फार उपयुक्‍त असल्यामुळे मधुमेह्यांनी गाजराचा रस घ्यावा, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
गाजराच्या रसात जंतुनाशक गुण आहेत. त्यामुळे आतड्यात असणारे हनीकारक जंतू नष्ट होऊ शकतात. गाजराच्या रसाच्या नियमित सेवनाने आतड्यातील व्रण कमी होतात.
गाजरातील ई-जीवनसत्त्वामुळे कॅन्सरच्या पेशीची वाढ होऊ शकत नाही. गाजराचा रस कॅन्सरसारख्या भयानक रोगावर विजय मिळवू पाहात आहे. म्हणजे गाजरे खूप खाल्ली की पित्त होत नाही.
गाजराच्या रसाबरोबर पालक रस आणि कोबीरस मिसळून जर घेतलो तर आपल्या केसांचे आरोग्य उत्तमे राहते. गाजराच्या रसाच्या सेवनामुळे केसांच्या मुळांना उत्तम पोषण मिळते. त्यामुळे केस गळायचे थांबतात. गाजरे भरपूर खाल्ल्यामुळे किंवा रस घेतल्यामुळे केस भरपूर वाढतात. मुख्य म्हणजे केस पिकण्यापूर्वीच गाजर-रसाची चिकित्सा अंमलात आणली तर केसांचा नैसर्गिक रंग टिकून ठेवण्यास खूप मदत होते.
गाजराचा रस हा सौंदर्यवर्धक आहे. त्यामुळे त्वचेची कांती छान राहते. तोंडावर तजेला येतो. रक्‍त वाढते, रूक्ष आणि निस्तेज त्वचेसाठी गाजररस अमृत आहे.

===============

The post आरोग्यवर्धक गाजर …! जाऊन घ्या महत्वाचे फायदे… appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar