[[{“value”:”
आयुष्य कितीही कठीण प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला न डगमगता तोंड देण्यात खरी मजा असते असे म्हटले जाते. या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी काही टिप्स महत्वाच्या आहेत. त्या जाणून घेऊ
१) तुमच्या कुटुंबीयांना किंवा अगदी जवळच्या मित्रांनाही ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, अशा व्यक्तीला देखील तुमच्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टी सांगू नका.
२) ज्या व्यक्ती स्वतःशी देखील खोट्या बोलतात, त्यांच्याकडून तुम्ही कधीही प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवू शकत नाही.
३) तुमच्या चुकांसाठी पालकांवर ठपका ठेवून त्यांना दोष देत बसण्यापेक्षा तुम्ही त्यांना माफ करून पुढे चालू लागला तर तुम्ही दहा पट आणि अधिक आनंदी आयुष्य जगू शकता.
४) समाज काय म्हणेल याची काळजी करू नका किंवा समाजाच्या सल्ल्यापासून स्वतःला मुक्त करा. कारण तुम्ही काय करत आहात याची दुसऱ्या कुणालाही कल्पना नसते. म्हणजेच तुम्ही कुठल्या क्षेत्रात करिअर करत आहात, काय शिकत आहात, तुमची आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती याबद्दल इतरांना फारशी माहिती नसते.
५) जर का तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर तुम्ही आयुष्यभर वेळ वाया घालवत बसाल आणि त्यातून काहीही घडणार नाही.
६) जर तुमच्या सध्याच्या नोकरीतून तुम्हाला मनासारखी प्राप्ती होत नसेल तर असे समजा की तुम्ही तुमची स्वप्ने संपुष्टात आणण्यासाठी पगार घेत आहात.
७) जेव्हा तुम्ही तुमचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागता, तेव्हा तुमचे जवळचे 99% मित्र तुमच्या पासून लांब जाऊ लागतात.
८) तुम्हाला शंभर काय एकाही प्रेरणादायी पुस्तकाची गरज नसते. जर का तुम्ही स्वयंशिस्त पाळून कृती करू लागलात तर तुम्ही नक्की प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकता.
९) तुमच्या लग्नाचा जोडीदार हा तुमच्या आयुष्यातील आर्थिक शारीरिक आणि भावनिक निर्णयातील सगळ्यात मोठा पाठीराखा आणि भागीदार असतो. त्यामुळे जर का तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यभर त्रास भोगाव लागू शकतो.
१०) तुम्हाला फक्त एक जरी मित्र असेल तरी चांगले. मात्र तो तुमच्या बरोबर आनंदी राहणारा तुमच्या यशात आनंद व्यक्त करणारा आणि पाठिंबा देणारा आणि तुमच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणारा असावा. दुसरीकडे 15-20 नव्हे 100 मित्र असले आणि ते स्वार्थी आळशी आणि तुमच्या यशाबद्दल मत्सर वाटणारे असतील तर त्यांचा काहीही उपयोग नसतो.
The post आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स appeared first on Dainik Prabhat.
“}]]